मद्यप्राशन करून युवतीचा धिंगाणा.

By Admin | Updated: March 26, 2017 01:05 IST2017-03-26T01:05:20+5:302017-03-26T01:05:20+5:30

नागाळा पार्क परिसरातील एका हाॅटेल मध्ये पैसे देण्याच्या कारणा वरुण त्यायुवतीने हाॅटेल व्यवस्थापकासह कर्मचारी याच्याशी वाद

Drunken woman | मद्यप्राशन करून युवतीचा धिंगाणा.

मद्यप्राशन करून युवतीचा धिंगाणा.

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 26 - नागाळा पार्क परिसरातील एका हाॅटेल मध्ये पैसे देण्याच्या कारणा वरुण त्यायुवतीने हाॅटेल व्यवस्थापकासह कर्मचारी याच्याशी वाद घालत धिंगाणा घातला.
  ही घटना शनिवारी रात्री घडली.हा प्रकार समजताच शाहुपुरी पोलीस घटनास्थळी गेले असता संबंधित युवती पसार झाली.मात्र त्यायुवतीच्या मित्राला चौकशी साठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवती प्रथम एकटीच मद्यपान करण्यासाठी आली होती.काही वेळाने तिने आपल्या तिन मित्रानाही  मद्यप्राशन करण्यासाठी बोलवुन घेतले.त्यानंतर  मद्यप्राशन करून झाल्यावर बिलाच्या थोडे पैसे दिले.मात्र राहीलेले पैसे देण्यासाठी संबंधित युवतीने नकार दिला.यावरून व्यवस्थापक व तिच्यात वाद झाला यातुन तिने धिंगाणा घातला या प्रकार नंतर  संबंधित युवती मित्रासह पसार झाले.मात्र यातील एका मित्राला हाॅटेल मधील कर्मचारीनी पकडुन ठेवले होते.हा प्रकार हाॅटेल व्यवस्थापनाने पोलीसांना कळविला.
दरम्यान व्यवस्थापकासह कर्मचारी पोलीस ठाण्यात आले.त्याचवेळेत संबंधीत युवती आपल्याअन्य मित्रांसमवेत हाॅटेल जवळ गेली मात्र हाॅटेल बंद असल्याचे पाहुन ती तेथुन निघुन गेली.ही युवती शहरातील नामवंत हाॅटेल मध्ये जाऊन वारंवार आसेच प्रकार करत असल्याचे चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात होती.रात्री उशीरापर्यंत पोलीस यांची माहिती घेत होते.

Web Title: Drunken woman