शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दारूच्या नशेत मुलानेच केला आईचा खून; आईने एकटीने केला होता सांभाळ

By उद्धव गोडसे | Updated: November 2, 2023 12:15 IST

कागल : दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने नशेत जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ...

कागल : दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने नशेत जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना वंदूर (ता. कागल) येथील वाईंगडे मळ्यात घडली. सुनीता अशोक वाईंगडे (वय ५२) असे या दुर्दैवी मातेचे नाव असून, संशयित नीलेश अशोक वाईंगडे (३०) यास अटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला.याबद्दल अधिक माहिती अशी की, संशयित नीलेश वाईंगडेला दारूचे व्यसन आहे. अधूनमधून तो आईशी भांडत होता. बुधवारी दिवसभर तो दारूच्या नशेत होता. वंदूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकून रस्ताही रोकण्याचा प्रकार त्याने केला. रात्री दारूच्या नशेत आईचा खून केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे अंगणात झोपला होता. सकाळी उठून पुन्हा दारू पिऊन आला आणि आईला उठवू लागला.आई कोणताही प्रतिसाद देत नाही म्हणून त्यांने शेजारी राहणाऱ्या चुलत चुलत्यांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मद्यधुंद अवस्थेत त्याने आईच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार केला. तसेच डोके भिंतीवर आपटून गळाही आवळला असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, सहायक पोलिस निरीक्षक निशिकांत गच्चे, शैलजा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.आईने एकटीने केला होता सांभाळआरोपी नीलेश हा ऊसतोडणी व अन्य शेतमजुरीची कामे करतो. घरची तीन एकर शेती आहे. सुनीता या शेती व म्हशी पाळून संसार चालवीत होत्या. संशयित नीलेश हा लहान असतानाच वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने एकटीने त्याचा सांभाळ केला होता. त्यांच्या शेजारीच चुलते, चुलतभाऊ राहतात. मनमिळाऊ स्वभावाच्या सुनीता यांच्या अशा निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस