शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

बिश्णोई गँगकडून ड्रग्सची तस्करी, राजस्थान, हुबळी ते पुणे कनेकशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 18:05 IST

पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर पोलीसांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या राजस्थानमधील दोघा गँगस्टारच्या प्रकृत्तीत सुधारणा झाली आहे. ००७ या नावाने ही गँग राजस्थानमध्ये कार्यरत आहे. त्यांचा म्होरक्या शामलाल पुनिया उर्फ बिश्णोई आहे. या गँगकडून राजस्थान, हुबळी ते पुणे अशी ड्रग्सची तस्करी केली जात होती. राजस्थानमध्ये पोलीसांना अनेक गुन्'ात हे गँगस्टार हवे होते.

ठळक मुद्देबिश्णोई गँगकडून ड्रग्सची तस्करी, राजस्थान, हुबळी ते पुणे कनेकशनचकमकीतील जखमी दोघा गँगस्टारची प्रकृत्ती स्थिर

कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्यावर पोलीसांच्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या राजस्थानमधील दोघा गँगस्टारच्या प्रकृत्तीत सुधारणा झाली आहे. ००७ या नावाने ही गँग राजस्थानमध्ये कार्यरत आहे. त्यांचा म्होरक्या शामलाल पुनिया उर्फ बिश्णोई आहे. या गँगकडून राजस्थान, हुबळी ते पुणे अशी ड्रग्सची तस्करी केली जात होती. राजस्थानमध्ये पोलीसांना अनेक गुन्'ात हे गँगस्टार हवे होते.

वडगाव पोलीस ठाण्यात गँगवर गुन्हा दाखल केला असून त्यांचे पुण्यामध्ये कोणाशी कनेकशन आहे, त्याचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.सीपीआरमध्ये पोलीस बंदोबस्तात जखमी शामलाल गोवर्धनराम पुनिया उर्फ बिश्णोई (वय २४, रा. भोजासर, जि. जोधपूर), श्रवणकुमार मनोहरलाल मांजू उर्फ बिश्णोई (२४, रा. विष्णुनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोथपूर) यांचेवर उपचार सुरु आहेत.

तिसरा साथीदार कारचालक श्रीराम पांचाराम बिश्णोई (२३, रा. बेटलाईन जोथपूर) हा वडगाव पोलीसांच्या ताब्यात आहे. शाम पुनिया याचे विरुध्द दरोडा, जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, बेकायदेशीर आर्मस बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे एकूण १२ तर श्रवणकुमार याचेवर दोन व श्रीराम मांजु याचेविरुध्द १९ गुन्हे दाखल आहेत.

या तिन्ही गुन्हेगारांवर महानिरीक्षक जोधपूर यांनी पकडून देणाऱ्यास प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तसेच शामलाल पुनिया याचेवर अतिरीक्त महानिर्देशक पोलीस अपराध शाखा राजस्थान यांनी २० हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. राजस्थान पोलीस या गँगच्या मागावर होते.राजस्थानचे पोलीस कोल्हापूरातराजस्थान पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे अधिकारी नरेंद्र पुनिया पथकासह कोल्हापूरात आले आहेत. त्यांचेसोबत बोजासार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिसिंह राजपुरोहित, श्रवणकुमार, देवाराम बिश्णोई, मोहन राय, शेवान राय यांचा समावेश आहे. त्यांनी सीपीआरमध्ये जखमी शामलाल व श्रवणकुमार यांचे भेट घेवून चौकशी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांचेशी चर्चा केली. वडगाव पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या श्रीराम बिश्णोई याचेकडे या पथकाने चौकशी केली.

बिश्णोई गँगच्या विरोधात राजस्थान-जोधपूर मध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गँगचा हुबळी येथून आम्ही पाठलाग करीत होतो. अतिशय धाडसाने कोल्हापूर पोलीसांनी या गँगच्या म्होरक्यासह तिघांना पकडले आहे. न्यायालयाचे मंजूरीने त्यांचा ताबा लवकरच आम्ही घेवून जोधपूरला रवाना होणार आहे.नरेंद्र पुनिया, राजस्थान पोलीस दलाचे गुन्हे शाखेचे अधिकारी.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर