शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विळखा अमली पदार्थांचा: दिल्लीतील घातक इंजेक्शन्सची पोळेमुळे खेड्यापाड्यांत 

By उद्धव गोडसे | Updated: July 22, 2025 19:11 IST

शरीराची दुर्दशा : कायद्यातील पळवाटांमुळे विक्रेत्यांचे फावले

उद्धव गोडसेकोल्हापूर : गांजा, अफू, चरस, एमडी ड्रग्जसह शरीराला अधिक घातक असलेल्या मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनद्वारे नशा केली जात आहे. दिल्लीतून ऑनलाइन पद्धतीने मागवलेल्या इंजेक्शनचा पुरवठा खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचला आहे. ही नशा शरीर पोखरून टाकणारी असल्याने घातक ठरत आहे. कायद्यातील पळवाटांमुळे तस्कर आणि विक्रेत्यांचे फावल्याने याचा धोका अधिकच वाढला आहे.अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारे विक्रेते सतत नवनवीन पदार्थांच्या शोधात असतात. वैद्यकीय क्षेत्रात उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधे आता नशेसाठी वापरली जात आहेत. वास्तविक अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकण्यास निर्बंध आहेत. तरीही काही तस्कर आणि औषध वितरक संगनमताने याची छुपी विक्री करून लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. औषधांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीने याला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.तस्करांकडून मेफेनटरमाईन सल्फेट या गुंगीकारक औषधांची नशेसाठी विक्री केली जात आहे. चार-पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात याचा वापर अत्यल्प होता. अलीकडे नशेखोरांकडून याच्या मागणीत कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळेच पोलिसांच्या कारवाया वाढल्या आहेत. खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य अजय श्रीकांत डुबल (वय ४४) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गुंगीकारक औषधे जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह करवीर आणि इचलकरंजी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत मोठा साठा जप्त केला आहे. 

धोका काय?मेफेनटरमाईन सल्फेटचे इंजेक्शन सातत्याने घेतल्यास याचा शरीरातील रक्तदाब, हृदय, मूत्रपिंड यावर परिणाम होतो. मानसिक अस्वस्थता वाढते. मेंदूचे शरीरावरील नियंत्रण सुटून इतर आजार उद्भवू शकतात. काही अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवण्याचा धोका असतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

शिक्षा होण्याचे प्रमाण कमीगुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ नुसार पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात. या कायद्यानुसार दोषींना सात ते १० वर्षांचा कारावास होऊ शकतो. पोलिसांकडून होत असलेल्या कारवायांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र, तस्कर आणि विक्रेत्यांवर आरोपपत्र दाखल करणे, न्यायालयात त्याच्या विरोधातील ठोस पुरावे सादर करणे आणि त्याला शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे काम होत नाही. त्यामुळे पुन्हा-पुन्हा तेच आरोपी तस्करीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे दिसतात.

जिल्ह्यात अफूचाही वापरराजस्थानातून आणलेल्या अफूची पुणे-बंगळुरू महामार्गावर विक्री केली जाते. बहुतांश ट्रकचालक अफूची खरेदी करतात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गेल्या वर्षभरात दोन कारवाया करून अफू तस्करीचे राजस्थान कनेक्शन उघडकीस आणले होते.

विक्रीची साखळी तोडणे गरजेचेसर्वच अमली पदार्थांच्या विक्रीतून मोठा नफा मिळत असल्याने विक्री करणारे रॅकेट वाढले आहेत. यांची साखळी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कार्यरत आहे. ही साखळी तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाया होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

तस्कर आणि विक्रेत्यांना पकडण्याचे काम पोलिसांकडून सुरूच आहे. या मार्गाकडे जाणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी पालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मुलांच्या वर्तनाकडे लक्ष ठेवून त्यांना वेळीच समज द्यावी. खरेदीदार नसतील तर याची विक्री थांबेल. - योगेश कुमार, पोलिस अधीक्षक