शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार गैरहजर राहणाऱ्या औषध निर्माण अधिकारी बडतर्फ; कोल्हापूर जिल्हा परिषदेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 12:38 IST

‘लोकमत’ वृत्ताची ध्वजारोहणावेळी चर्चा

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी तिघांना निलंबित केल्यानंतर करवीर तालुक्यातील इस्पूर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राकडील औषध निर्माण अधिकारी कल्याणी वड्ड यांना बडतर्फ केले. या कारवाईची बातमी केवळ ‘लोकमत’मध्येच प्रसिद्ध झाल्याने साहजिकच जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र दिन ध्वजारोहणावेळी त्याची जोरदार चर्चा झाली.एक ग्रामसेवक, एक औषध निर्माण अधिकारी आणि बांधकाम विभागाचा शिपाई अशा तिघांना एकाचवेळी निलंबित केल्याचे हे वृत्त गुरुवारी प्रकाशित झाले. सकाळी अनेकजण ध्वजारोहणासाठी जिल्हा परिषदेत आले तेव्हा सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये या कारवाईची चर्चा सुरू होती.गेली काही वर्षे वड्ड या वारंवार गैरहजर राहात होत्या. याबाबत त्यांना नोटीस काढण्यात आल्यानंतर त्यांनी या नोटिसींना उत्तर देण्याचेही टाळले. याबाबत त्यांची विभागीय चौकशी केली असता त्यामध्ये त्या दोषी आढळल्या. यानंतरही त्यांनी नोटीस काढल्यानंतर खुलासाही करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे कामातील अनियमितता, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर अशा विविध कारणांमुळे त्यांना बुधवारी बडतर्फ करण्यात आले.

जिल्हा परिषदेत शांततामुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. हे १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने आणि आठवड्याचा शेवटचा कामाचा दिवस असल्याने जिल्हा परिषदेत शुक्रवारी शांतताच होती. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी आपल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी पदाच्या दालनातूनच कार्यभार सुरू केला.

येजरे यांना नोटीस, हुपरेंवरील कारवाईची प्रतीक्षादरम्यान भाऊसिंगजी रोडवरील गाळ्यातील एक गाळा आपल्याच सहीने आपल्या मुलाला भाड्याने देणारे बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सदाशिव तुकाराम येजरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा करण्यास त्यांना आदेश देण्यात आला आहे. दरम्यान पाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाटप्रकरणी शाखा अभियंता प्रदीप हुपरे यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार हे गुलदस्त्यात आहे. या जुन्या टाक्यांची किमत जास्तीत जास्त २० हजारापर्यंत होणार असल्याने निलंबनाऐवजी एक वेतनवाढ रोखण्याचा पर्याय पुढे आल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद