शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक होणार तयार : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 17:05 IST

Collcator, hasanmusrif, kolhapurenews, droan ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक तयार होणार आहे. अचूक मालमत्तापत्रक तयार झाल्याने याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

ठळक मुद्देड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक होणार तयार : मुश्रीफबामणी येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणीचा ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर : ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक तयार होणार आहे. अचूक मालमत्तापत्रक तयार झाल्याने याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील बामणी येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजनेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कागल पंचायत समितीच्या सभापती पुनम मगदूम, जिल्हा परिषद सदस्य अंबरिष घाटगे, उपविभागीय अधिकारी रामहरी भोसले, तहसिलदार शिल्पा ठोकडे, भूमि अभिलेख विभागाचे अधीक्षक वसंत निकम, बामणीचे सरपंच रावसाहेब पाटील यांच्यासह बामणी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे त्यांच्या जमिनीचा 7/12 उतारा उपलब्ध होतो त्याच प्रमाणे गावठाणाचे सीमांकन झाल्यानंतर प्रत्येक नागरीकास त्याच्या हक्काच्या मालमत्तेचे मालकीपत्रक उपलब्ध होणार आहे. अचुक मालमत्ता मालकीपत्रकामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे व्यवहार करण्यास कोणतीही समस्या येणार नाही. खरेदी-विक्री, बँक कर्ज, मिळकत हस्तांतर या बाबी सुलभतेने पार पाडण्यास मदत होईल, असेही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले.  ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी मनुष्यबळाचा वापर करुन मोजणी होणार असून ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीमध्ये पारदर्शकता व अचुकता असणार आहे. ड्रोनद्वारे गावठाणांचे सीमांकन केल्यामुळे गावठाणातील प्रत्येक घराचा, खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा तयार होईल. गावातील मालमत्तांचे सीमांकन करण्यासाठी ग्रामपंचायतीस येणारा खर्च पंधाराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या अबंधीत अनुदानातून (अनटाईड) करण्यास परवानगी दिली जाईल. गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी ग्रामपंचायतीना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या योजनेतून गावकऱ्यांना त्यांच्या मालमत्तेच्या मालकीपत्रक देण्याचे काम होणार असून गावकऱ्यांबरोबरच ग्रामपंचायतीसही याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविले जात असून या अभियानातून जनतेची प्रलंबित कामे मार्गी लावली जात असल्याचे ते म्हणाले.ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजना ग्रामविकास विभाग, महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मालमत्ता पत्रकामुळे आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे. मिळकत हस्तांतरण, बँक कर्ज या बाबी सुलभतेने पार  पाडण्यास मदत होईल असे भूमि अभिलेख अधिक्षक  निकम यांनी प्रास्ताविकात सांगितले. पंचायत समिती सभापती पुनम मगदूम व जिल्हा परिषद सदस्य अंबरिष घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले.गावठाण भूमापन योजनेमुळे नागरिकांना होणारे फायदे

  •  प्रत्येक धारकाचे जागेचा/मिळकतीचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील व मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.
  • प्रत्येक धारकाला आपले मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका व सनद मिळेल
  •  गावठाणातील जागेची मिळकत पत्रिकेस शेतीचे 7/12 प्रमाणेच धारकाचे मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता आहे.
  •   मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होई शकते, तारण करता येईल, जामिनदार म्हणून राहता येईल आणि विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.
  • बांधकाम परवानगीसाठी मिळकत पत्रिका आवश्यक आहे.
  •  सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपले मिळकतीचे संरक्षण करता येईल.
  • गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद संपुष्ठात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.
  •  मिळकती संबंधी बाजारपेठेत तरलता येऊन आर्थिक पत उंचावेल.
टॅग्स :collectorजिल्हाधिकारीHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर