रिक्षाची तोडफोड करत चालकास रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST2021-09-05T04:29:26+5:302021-09-05T04:29:26+5:30

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने रिक्षाचालकास बेदम मारहाण करून त्यांच्या रिक्षाची तोडफोड करण्यात आली. किरण परशुराम शिंदे (वय ६२, ...

The driver was hit by a rod while vandalizing the rickshaw | रिक्षाची तोडफोड करत चालकास रॉडने मारहाण

रिक्षाची तोडफोड करत चालकास रॉडने मारहाण

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून लोखंडी रॉडने रिक्षाचालकास बेदम मारहाण करून त्यांच्या रिक्षाची तोडफोड करण्यात आली. किरण परशुराम शिंदे (वय ६२, रा. रामानंदनगर) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. हा प्रकार निर्माण चौक परिसरात शनिवारी सकाळी घडला. पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे अशी : दीपक बराले, संकेत बराले, आशिष बराले (सर्व रा. रामानंदनगर) व तीन अनोळखी.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी शिंदे व बराले हे दोन्हीही कुटुंब एकमेकांसमोर राहतात. त्यांच्यात शुक्रवारी झालेला वाद मिटविण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी संशयित दीपक, संकेत, आशिष बराले व अन्य अनोळखी तिघांनी तेथे येऊन शिंदे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली, तसेच त्यांच्या रिक्षाच्या काचाही फोडून नुकसान केले. याबाबतची फिर्याद शिंदे यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. त्यानुसार सहा संशयितांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबत अधिक तपास सहायक फौजदार विजय कोळी करीत आहेत.

Web Title: The driver was hit by a rod while vandalizing the rickshaw