शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर येथील भीषण अपघातात सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 17:33 IST

सिंधुदुर्ग : बोलेरो पिकअप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री सुमारे ...

सिंधुदुर्ग : बोलेरो पिकअप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री सुमारे साडे दहाच्या सुमारास घडली. मृतात टेम्पो चालक सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथील चंद्रकांत ऊर्फ बाबल कृष्णा गावकर (५६) यांचा समावेश आहे. हा अपघात कागल कापशी रोड येथील शेंडूर तिठा बामणी गावानजीक घडला.चंद्रकांत गावकर हे सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा माल घेऊन सावंतवाडीत येत असताना हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की या दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. त्यात हे दोन्ही चालक अडकून राहिले होते. बोलेरो पिकअप चालक संतोष पवार (शनिवार पेठ कोल्हापूर) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यात त्यांचाही मृत्यू झाला. बोलेरो पिकअप चालकाचा सहकारी वैभव राऊत याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शाहूपुरीत सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.या अपघाताची माहिती गुरुवारी रात्री उशिरा ओटवणे गावात पोहोचताच ओटवणे गावठाणवाडी मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर यांच्यासह ग्रामस्थ तत्काळ कोल्हापूर येथे रवाना झाले. चंद्रकांत गावकर यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी सकाळीच समजताच ओटवणे गावावर शोककळा पसरली. सर्वांनाच त्यांच्या अपघाती मृत्यूचा धक्काच बसला. गेली अनेक वर्षे चंद्रकांत गावकर हे विना अपघात चालक म्हणून सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टवर कार्यरत होते. आज, शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव घेऊन गावी आणण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. येथील चेतन आणि चंदन गावकर यांचे ते वडील होत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरAccidentअपघात