संतप्त नागरिकांकडून चालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:16+5:302021-02-05T06:51:16+5:30

इचलकरंजी : येथील गुजरी पेठ परिसरातून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागील चाकात सापडून सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ...

Driver beaten by angry citizens | संतप्त नागरिकांकडून चालकास मारहाण

संतप्त नागरिकांकडून चालकास मारहाण

इचलकरंजी : येथील गुजरी पेठ परिसरातून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागील चाकात सापडून सात वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. समीद महंमद लाटकर (रा. मुजावर गल्ली) असे त्याचे नाव आहे. अपघातानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टरचालकास मारहाण केली. त्यामुळे चालकाने तेथून पलायन केले. या प्रकरणाची गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

गुजरी पेठ येथील मारुती मंदिर परिसरातून अतिशय अरुंद रस्त्यावरून उसाची वाहतूक सुरू होती. ट्रॅक्टर (एमएच ०९ यू ७५४९) बुधवारी दुपारी ऊस भरून चालला होता. त्यावेळी समीद हा खाऊ आणण्यासाठी निघाला होता. अचानक तो ट्रॉलीच्या मागील चाकात सापडला. ट्रॉलीची चाके त्याच्या दोन्ही पायांवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी या मार्गावरून ऊस वाहतूक ताबडतोब बंद करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

Web Title: Driver beaten by angry citizens