ड्रेनेज लाईनमध्येच नगरसेवकाचा ठिय्या

By Admin | Updated: July 17, 2014 00:29 IST2014-07-17T00:01:47+5:302014-07-17T00:29:02+5:30

खणलेल्या खड्ड्यातच ठिय्या आंदोेलन केले.

In the drainage line, the corporator's stance | ड्रेनेज लाईनमध्येच नगरसेवकाचा ठिय्या

ड्रेनेज लाईनमध्येच नगरसेवकाचा ठिय्या

कोल्हापूर : येथील दत्त कॉलनी परिसरातील सुश्रृषा नगर येथे गेली दीड ते दोन वर्षे रखडलेल्या ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करावे. या मागणीसाठी नगरसेवक महेश गायकवाड यांनी ड्रेनेजसाठी खणलेल्या खड्ड्यातच ठिय्या आंदोेलन केले.
सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे व स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी गायकवाड यांची समजूत काढून त्वरित खड्डाच बुजविण्याचे आदेश दिले. त्यानंतर गायकवाड यांनी आंदोलन मागे घेतले. नगरसेवकाच्या अनोख्या आंदोलनाची दिवसभर महापालिकेत चर्चा सुरू
होती.
ड्रेनेज लाईनच्या बंद अवस्थेतील कामामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. दहा फुटांपेक्षा अधिक खोल खणलेल्या या खड्ड्यात ड्रेनेजचे पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण
झाला होता. याबाबत गायकवाड यांनी थेट आयुक्त विजयालक्ष्मी
बिदरी यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गायकवाड यांनी खड्ड्यातच ठिय्या मांडला.
यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत खड्डा बुजविण्यास सुरुवात केली. हे काम दोन दिवसांत पूर्ण न झाल्यास पुन्हा परिसरातील नागरिकांसह महापालिकेवर
मोर्चा काढण्याचा इशारा गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the drainage line, the corporator's stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.