प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:18+5:302021-02-16T04:26:18+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयोग व महापालिका प्रशासन स्तरावर त्याची जोरदार तयारी सुरू ...

The draft voter lists will be released today | प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार

प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयोग व महापालिका प्रशासन स्तरावर त्याची जोरदार तयारी सुरू आहे. याआधी प्रभाग निश्चिती व त्यावरील आरक्षण जाहीर झाले आहेत. आता प्रत्येक प्रभागाच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रारूप याद्या निश्चित करून त्या नागरिकांना पाहण्यासाठी दि. १६ फेब्रुवारी ही तारीख राज्य निवडणूक आयोगाकडून निश्चित करून देण्यात आली होती.

त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शहरातील चारही विभागीय कार्यालयांमार्फत हे काम हाती घेण्यात आले होते. उपायुक्त निखिल मोरे यांच्या नियंत्रणाखाली उपशहर अभियंता एन. एस. पाटील, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दवडे, हर्षजित घाटगे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. प्रारूप याद्या जाहीर करण्याचा दिवस जसा जवळ येईल, तसे गेले चार दिवस सुमारे शंभरहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करत राहिले. आज, मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रत्येक विभागीय कार्यालयात प्रभागनिहाय याद्या पाहायला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वेबसाईटवर देखील या याद्या पाहणे, डाऊनलोड करून घेणे शक्य होणार आहे.

-२३ फेब्रुवारीपर्यंत हरकती स्वीकारणार-

आज, मंगळवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होताच त्यावर दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येतील. त्या त्या विभागीय कार्यालयात हरकती व तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन दि. २ मार्च रोजी त्या अंतिम स्वरूपात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर दि. १२ मार्चला शहरातील सर्व मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

-पालिका प्रशासन सक्रिय -

महानगरपालिका निवडणूक जशी जवळ येईल, तशी प्रशासनाची धांदल उडाली आहे. दैनंदिन कामे काहीशी बाजूला ठेवून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. ही निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: The draft voter lists will be released today