वीस विकास संस्थांची प्रारूप यादी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:35+5:302021-09-21T04:27:35+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील २० विकास संस्थांची सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये गगनबावडा, भुदरगड, कागल, राधानगरी व पन्हाळा तालुक्यात ...

Draft list of twenty development institutes published | वीस विकास संस्थांची प्रारूप यादी प्रसिद्ध

वीस विकास संस्थांची प्रारूप यादी प्रसिद्ध

कोल्हापूर : जिल्ह्यातील २० विकास संस्थांची सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये गगनबावडा, भुदरगड, कागल, राधानगरी व पन्हाळा तालुक्यात संस्थांचा समावेश आहे.

राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील ६२४ पैकी २० विकास संस्थांच्या मतदार यादीचा कार्यक्रम सहकार विभागाने सोमवारी प्रसिद्ध केला. या संस्थांच्या यादीवर २९ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हरकती नोंदवता येणार आहेत. हरकतीवर ११ ऑक्टोबरपर्यंत निर्णय द्यायचा असून, त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आजपासून रोज टप्प्याटप्प्याने २०-२० संस्थांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

तालुकानिहाय विकास संस्था अशा

गगनबावडा : विठलाई- म्हाळुंगे, सांगसाईदेवी- सांगशी, गणेश- किरवे, गगनबावडा- पाटीलवाडी.

भुदरगड - रामलिंग- नितवडे, रामलिंग- फये, राम- शेणगाव.

कागल- भावेश्वरी- अर्जुनवाडा, नवजीवन- हमीदवाडा, एकोंडी- एकोंडी, राम- आणूर, जगदंबा- मांगनूर, दत्त-पिराचीवाडी.

राधानगरी - हनुमान- बनाचीवाडी, लिंगभैरवनाथ - रामनवाडी, महालक्ष्मी- राधानगरी.

पन्हाळा - सिद्धेश्वर-पोंबरे, महादेव- मानवाड, दिगंबर- निवडे.

Web Title: Draft list of twenty development institutes published

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.