शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

Kolhapur: इचलकरंजीचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध, एक हजार हेक्टर रहिवासी क्षेत्राचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 12:27 IST

अरुण काशीद इचलकरंजी : महापालिकेने एक हजार हेक्टर रहिवासी क्षेत्राचा समावेश असलेला संपूर्ण शहराचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा मंगळवारी ...

अरुण काशीदइचलकरंजी : महापालिकेने एक हजार हेक्टर रहिवासी क्षेत्राचा समावेश असलेला संपूर्ण शहराचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा मंगळवारी प्रसिद्ध केला. या विकास आराखड्यामध्ये शिवतीर्थ सुशोभीकरण, मोठे तळे विकास, रुग्णालये, खेळाचे मैदान आदींचा समावेश केला आहे.शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विकास आराखडा महत्त्वाचा असतो. आतापर्यंत चार विकास आराखडे मंजूर करण्यात आले. मात्र, एकत्रित आराखडा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. चारही आराखड्यांचा एकत्रित ताळमेळ घालताना कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत होते, तसेच हद्दी, रस्ते जुळत नव्हते. नवीन पद्धतीचा वापर केल्याने विकास योजना अचूक होण्यास मदत झाली आहे.

शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात पोहोचली आहे. अनेक नागरी कामांसाठी आरक्षणाची आवश्यकता होती. त्यामुळे या सर्व विकास आराखड्यांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचा ठराव ३० जून २०२१ ला करण्यात आला होता. हा विकास आराखडा भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर करून तयार केल्याने बांधकामाचे क्षेत्र दिसते. त्यामुळे आरक्षण टाकताना सुलभता व अचूकता आली.

यापूर्वी रहिवासी क्षेत्रामध्ये टाकलेली विविध आरक्षणे वगळली असून, अनेक नवीन आरक्षणेही अंतर्भूत केली आहेत. रहिवासी क्षेत्रातील आरक्षण वगळल्यामुळे मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विकास आराखड्यामध्ये रहिवासीबरोबरच औद्योगिक, सार्वजनिक, शेती, वाणिज्य आदींचा विचार केला आहे. शिवतीर्थच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी सभोवती आरक्षण टाकले आहे. तसेच मोठे तळे येथे पार्किंग व महापालिका वापरासाठी आरक्षण धरण्यात आले आहे. 

विविध क्षेत्रांचा वाटा

  • रहिवासी क्षेत्र - एक हजार हेक्टर
  • औद्योगिक क्षेत्र - १६० हेक्टर
  • यंत्रमाग उद्योग - १७५ हेक्टर
  • सार्वजनिक क्षेत्र - ५४.३४ हेक्टर
  • बगीचा व मैदाने - १३५ हेक्टर
  • वाणिज्य क्षेत्र - ५८.७२ हेक्टर
  • शेती क्षेत्र - ९१८ हेक्टर
  • नागरी वापर क्षेत्र - ११६ हेक्टर

बांधकाम व्याप्त मंजूर विकास योजनेतील आरक्षणांना या विकास योजनेमध्ये दिलासा देण्यात आला आहे. गुरुवारी (दि.१५) प्रारूप विकास योजनेचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे. कोणावर अन्याय झाला असेल, तर पुराव्यासह राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत हरकती दाखल कराव्यात. - प्रशांत भोसले, प्र.सहायक संचालक नगररचना, इचलकरंजी महापालिका.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजी