डॉ. संजय पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:04 IST2021-02-20T05:04:57+5:302021-02-20T05:04:57+5:30

बोरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधसाखर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पाटील यांना शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ...

Dr. Meritorious Teacher Award to Sanjay Patil | डॉ. संजय पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

डॉ. संजय पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

बोरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधसाखर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पाटील यांना शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तासगाव (जि. सांगली) येथील पद्मभूषण डॉ. वसंतराव पाटील महाविद्यालयात आयोजित वार्षिक अधिवेशनात स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. शिवाजी पाटील, शिवीमचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सोनालकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. रघुनाथ केंगार, प्राचार्य मिलिंद हुजरे, डॉ. शहाजी पाटील, डॉ. दीपक स्वामी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

१८ संजय पाटील बिद्री

फोटो ओळी - बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पाटील यांना पुरस्काराने सन्मानित करताना अभयकुमार साळुंखे आदी.

Web Title: Dr. Meritorious Teacher Award to Sanjay Patil