डॉ. किरण पवार यांची शिरोळ तालुका प्रमुखपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:33+5:302021-05-07T04:24:33+5:30

महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक ...

Dr. Kiran Pawar elected as Shirol taluka chief | डॉ. किरण पवार यांची शिरोळ तालुका प्रमुखपदी निवड

डॉ. किरण पवार यांची शिरोळ तालुका प्रमुखपदी निवड

महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून डॉ. किशोर ठाणेकर, तर मंगेश चिवटे हे शिवसेना वैद्यकीय कक्ष, मुंबई येथे कक्षप्रमुख म्हणून काम पाहात आहेत. यांच्या माध्यमातून डॉ. पवार यांची निवड करण्यात आली.

डॉ. पवार यांच्या २०१९ मधील महापुरातील सामाजिक कार्य तसेच कोरोना महामारीमध्ये त्यांनी रुग्णांना दिलेली सेवा याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, शिरोळ तालुका प्रमुखपदी नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निवडीचे पत्र खासदार माने यांच्याहस्ते त्यांना देण्यात आले.

फोटो - ०६०५२०२१-जेएवाय-०४

फोटो ओळ - नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील डॉ. किरण पवार यांना निवडीचे पत्र खासदार धैर्यशील माने यांच्याहस्ते देण्यात आले.

Web Title: Dr. Kiran Pawar elected as Shirol taluka chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.