डॉ. कौस्तुभ वाईकर यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:01+5:302021-06-01T04:18:01+5:30

१. सिद्धांत हॉस्पिटलकडून कोरोना रुग्णांची, रुग्णांच्या मृत्यूची, डिस्चार्जची माहिती रोज पोर्टलवर अपलोड केली जाते. एखादा दिवस नेट कनेक्शन मिळाले ...

Dr. Kaustubh Waikar's explanation | डॉ. कौस्तुभ वाईकर यांचे स्पष्टीकरण

डॉ. कौस्तुभ वाईकर यांचे स्पष्टीकरण

१. सिद्धांत हॉस्पिटलकडून कोरोना रुग्णांची, रुग्णांच्या मृत्यूची, डिस्चार्जची माहिती रोज पोर्टलवर अपलोड केली जाते. एखादा दिवस नेट कनेक्शन मिळाले नाही तर दुसऱ्या दिवशी माहिती अपलोड केली जाते. महापालिकेने दि. २४ मे रोजी काही गोष्टींची पूर्तता करण्यास सांगितले असून ती केली जात आहे.

२. बेलबाग येथील हॉस्पिटलची जागा आम्ही भाड्याने घेतली होती. त्या जागेचा घरफाळा मालक भरत होते. आमचा तसा करार झाला होता. त्या इमारतीच्या घरफाळ्याशी माझा कसलाही संबंध नाही. मी महापालिकेचा एक रुपयाचा घरफाळा थकविलेला नाही.

३. नवीन रुग्णालयाच्या इमारतीत अवैध बांधकाम झालेले नाही. आर्किटेक्टच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम झाले आहे. या जागेचा अंशत: भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे, आम्ही पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र द्या म्हणून पालिकेकडे मागणी केली आहे.

डॉ. कौस्तुभ वाईकर

Web Title: Dr. Kaustubh Waikar's explanation