कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी विद्यापीठातीलच जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती जाधव यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी कुलगुरू पदाच्या विशेष अधिकारांतर्गत प्र-कुलगुरूसाठी जाधव यांची नियुक्ती केली.
विद्यापीठाच्या ६३ वर्षाच्या इतिहासात प्र-कुलगुरूपदी पहिल्यांदाच महिलेस संधी मिळाली आहे. विद्यापीठात नियमित कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रभारी प्र-कुलगुरू पदाचा कार्यकाळ असणार आहे. जागतिक स्तरावर आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश आहे.माजी कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ ६ ऑक्टोबरला संपला. त्यांच्याबरोबर प्र-कुलगुरू व चार अधिष्ठाता यांचा कार्यभार संपला होता. त्यामुळे प्र-कुलगुरू कोण होणार याबाबतची उत्सुकता होती. प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाच्या शिफारशीस व्यवस्थापन परिषदेने संमती दिली.कुलगुरू डॉ. गोसावी यांनी गुरुवारी सायंकाळी डॉ. जाधव यांना प्र-कुलगुरूपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले. विद्यापीठ प्रशासनाकडून कुलपती कार्यालयाला कळविले आहे. डॉ. जाधव यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. संशोधक, कंत्राटी प्राध्यापक, वरिष्ठ प्रोफेसर, अधिष्ठाता ते प्र-कुलगुरू असा चढता आलेख राहिला आहे.
चौघांचे होते प्रस्तावया पदासाठी डॉ. आर. व्ही. गुरव, डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. बी. जी. कणसे व डॉ. ज्योती जाधव यांच्या नावाचे प्रस्ताव अधिकार मंडळासमोर आले होते. यात डॉ. जाधव यांच्या नावाच्या शिफारशीस व्यवस्थापन परिषदेने एकमतानी संमती दिली.
Web Summary : Dr. Jyoti Jadhav is the first woman appointed Pro-Vice-Chancellor of Shivaji University. The appointment, made by acting Vice-Chancellor Dr. Suresh Gosavi, marks a historic moment for the 63-year-old university. Her term lasts until a regular Vice-Chancellor is appointed. She previously served as the Head of the Biotechnology Department.
Web Summary : डॉ. ज्योति जाधव को शिवाजी विश्वविद्यालय की पहली महिला प्रो-वाइस-चांसलर नियुक्त किया गया। कार्यवाहक कुलपति डॉ. सुरेश गोसावी द्वारा की गई नियुक्ति 63 वर्षीय विश्वविद्यालय के लिए एक ऐतिहासिक क्षण है। उनका कार्यकाल नियमित कुलपति की नियुक्ति तक रहेगा। वह पहले जैव प्रौद्योगिकी विभाग की प्रमुख थीं।