जयसिंगपूर, शिरोळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST2021-04-15T04:22:23+5:302021-04-15T04:22:23+5:30

कोरोनाचे नियम पाळून क्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लक्ष्मण सकटे यांनी स्वागत केले. यावेळी ...

Dr. in Jaisingpur, Shirol. Babasaheb Ambedkar Jayanti in excitement | जयसिंगपूर, शिरोळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

जयसिंगपूर, शिरोळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कोरोनाचे नियम पाळून क्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लक्ष्मण सकटे यांनी स्वागत केले. यावेळी मिलिंद शिंदे, सुनील मोहिते, रमेश शिंदे, सुलोचना कांबळे, प्रेमला मुरगुंडे, डॉ. चिपरीकर, बाबूराव पाटील, अर्जुन देशमुख उपस्थित होते.

नगरपालिकेत नगराध्यक्षा डॉ. नीता माने, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक बजरंग खामकर, दादा पाटील-चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, रजनीकांत कांबळे, नगरसेविका सुलक्षणा कांबळे, प्रेमला मुरगुंडे उपस्थित होत्या. तसेच शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावरील बौद्ध विहारामध्ये जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिरोळ नगरपालिकेत नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

फोटो - १४०४२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, रमेश शिंदे, सुलोचना कांबळे, मिलिंद शिंदे, अर्जुन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Dr. in Jaisingpur, Shirol. Babasaheb Ambedkar Jayanti in excitement