डॉ. सुधाकरराव कोरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST2021-08-24T04:27:59+5:302021-08-24T04:27:59+5:30

पुण्यस्मरण दिनानिमित्त तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या वतीने मोफत दंत स्वच्छता शिबिर व वृक्षारोपण, दंत महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर ...

Dr. Greetings to Sudhakarrao Kore | डॉ. सुधाकरराव कोरे यांना अभिवादन

डॉ. सुधाकरराव कोरे यांना अभिवादन

पुण्यस्मरण दिनानिमित्त तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या वतीने मोफत दंत स्वच्छता शिबिर व वृक्षारोपण, दंत महाविद्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिर झाले. यावेळी ७० जणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन व वृक्षारोपण आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाले. अन्य रुग्णांसाठी एक महिना, तर वारणा समूहातील कर्मचाऱ्यांसाठी तीन महिने विनामूल्य दंत स्वच्छता शिबिर आहे. डॉ. सुधाकरराव कोरे यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखवली .

यावेळी डॉ. शरदिनी कोरे, डॉ. शिल्पा कोठावळे, डॉ. शैलेश कोरे, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, डॉ. विजय कोरे, प्रमोद कोरे, रूपाली कोरे, डॉ. कौशल कोठावळे, विश्वेश कोरे, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, शिवाजी जंगम, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी उपस्थित होते.

फोटो ओळी : नवे पारगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टमध्ये स्व. डॉ .सुधाकरराव कोरे यांच्या समाधिस्थळी अभिवादन करताना आमदार डॉ. विनय कोरे, डॉ. शरदिनी कोरे, डॉ. शिल्पा कोठावळे, डॉ. शैलेश कोरे, रूपाली कोरे आदी.

Web Title: Dr. Greetings to Sudhakarrao Kore