श्रीक्षेत्र आडी येथे डॉ.डी.वाय. पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:28+5:302021-09-13T04:23:28+5:30

कोगनोळी : आडी (ता.निपाणी) येथील संजीवन गिरी वरील दत्त देवस्थान मठाला त्रिपुरा व बिहार राज्याचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय. ...

Dr. DY at Shrikshetra Adi. Patil's visit | श्रीक्षेत्र आडी येथे डॉ.डी.वाय. पाटील यांची भेट

श्रीक्षेत्र आडी येथे डॉ.डी.वाय. पाटील यांची भेट

कोगनोळी : आडी (ता.निपाणी) येथील संजीवन गिरी वरील दत्त देवस्थान मठाला त्रिपुरा व बिहार राज्याचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी त्यांचे स्वागत केले.

शिक्षण क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल असलेले पद्मश्री डाॅ.डी.वाय. पाटील यांनी आडी येथील श्रीदत्त देवस्थान येथे येऊन परमपूज्य परमात्मराज महाराज यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यांनी महाराजांना स्वतःच्या दिनचर्येविषयी सांगितले. ८६ वर्षे वयातही डाॅ.डी.वाय. पाटील मंत्र जप व ग्रंथवाचन करीत असतात. त्यांनी आतापर्यंत प.पू. परमात्मराज महाराजांचे अनेक ग्रंथ वाचले आहेत. त्यांना यावेळी महाराजांनी ‘रस्याव’ हा नूतन ग्रंथ भेट म्हणून दिला. या ग्रंथाचेही अवश्य वाचन करणार असल्याचे डाॅ.डी.वाय. पाटील म्हणाले. वार्धक्यातही ग्रंथवाचन करीत राहत असल्याबद्दल प.पू. परमात्मराज महाराजांनी त्यांचे कौतुक केले.

डाॅ.डी.वाय. पाटील यांच्या नावावर आज अनेक विद्यापीठे, स्पोर्ट्स अकॅडमी आहेत. शिक्षण क्षेत्रात व इतरही क्षेत्रांमध्ये फार मोठे काम असूनही आध्यात्मिक क्षेत्राविषयी त्यांच्या मनात अत्यंत आवड आहे, हे विशेष आहे. आडी येथील श्रीदत्त क्षेत्राविषयी त्यांना प्रचंड आत्मीयता आहे. ते या स्थानी सातत्याने येऊन प.पू. परमात्मराज महाराजांची भेट घेत असतात. यावेळी आश्रमातील साधू साधक उपस्थित होते.

आडी येथील सदिच्छा भेटी वेळी डॉ.डी.वाय पाटील यांना परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी ‘रस्याव’ हा नूतन ग्रंथ भेट दिला.

120921\img-20210912-wa0007.jpg

आडी येथील सदिच्छा भेटी वेळी डॉ. डी वाय पाटील यांना परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी 'रस्याव' हा नूतन ग्रंथ भेट दिला.

Web Title: Dr. DY at Shrikshetra Adi. Patil's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.