डॉ. कादंबरी बलकवडे प्रभारी जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:04+5:302021-07-03T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी प्रभारी जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. एक महिना ...

डॉ. कादंबरी बलकवडे प्रभारी जिल्हाधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी प्रभारी जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. एक महिना हा कार्यभार अतिरिक्त स्वरूपात त्यांच्याकडे राहणार आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई वैयक्तिक कारणास्तव एक महिन्याच्या रजेवर गेले आहेत. जिल्हाधिकारी रुजू झाल्यापासून प्रथमच महिनाभराच्या दीर्घ रजेवर गेले. त्यामुळे त्यांचा कार्यभार महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे देण्यात आला. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी कार्यभार स्वीकारला.
कोरोना महामारीच्या काळात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चांगले काम केले आहे. पंधरा महिने महामारीच्या काळात अखंडपणे रात्रंदिवस कार्यालयात ठाण मांडून बसत त्यांनी आरोग्य सुविधा सुधारण्यावर अधिक जोर दिला. मात्र, अजून दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झालेला नाही. उलट राज्यभरात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग ओसरत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या मात्र सरासरी दीड हजारपर्यंत आहे.