भाजप जिल्हा कार्यालयात डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST2021-06-24T04:17:29+5:302021-06-24T04:17:29+5:30

कोल्हापूर : देशाच्या ऐक्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक ...

Dr. BJP district office. Greetings to Shama Prasad Mukherjee | भाजप जिल्हा कार्यालयात डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

भाजप जिल्हा कार्यालयात डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

कोल्हापूर : देशाच्या ऐक्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांना भाजपा जिल्हा कार्यालयात बुधवारी अभिवादन करण्यात आले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव व जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या हस्ते डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी संघटन सरचिटणीस अशोक देसाई व सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी मुखर्जी यांची "प्रखर राष्ट्रवादाची कल्पना" या विषयावर मनोगत व्यक्त केले. महेश जाधव म्हणाले, ‘एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे’ ही प्रसिद्ध घोषणा देणाऱ्या शामा प्रसादजींनी कायमच भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढा दिला. यावेळी मारुती भागोजी, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, सचिन तोडकर, किशोरी स्वामी, गायत्री राउत, अजित ठाणेकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

२३०६२०२१ कोल बीजेपी ०१

भाजप जिल्हा कार्यालयात महेश जाधव, राहूल चिकोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी डाॅ. शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले.

Web Title: Dr. BJP district office. Greetings to Shama Prasad Mukherjee