डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:07+5:302021-03-26T04:24:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आंबेडकर यांची जयंती यंदा अभिनव ...

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आंबेडकर यांची जयंती यंदा अभिनव अशा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. शरद गायकवाड, अविनाश शिंदे, अनिल धनवडे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
यावेळी प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, डी.जी.भास्कर, विश्वास देशमुख, बाळासाहेब भोसले, सुभाष देसाई, रुपाताई वायदंडे, जयसिंग जाधव, अस्मिता दिघे, नीलेश बनसोडे आदी उपस्थित होते. प्रा. गायकवाड म्हणाले, कोराेनाच्या पार्श्वभूमीवर ११ ते १४ एप्रिल या दरम्यान महात्मा फुले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. या कालावधीत राष्ट्रीयस्तरावरील विचारवंतांचे ऑनलाइन व्याख्यानमाला होणार आहे. भारताच्या जडणघडणीत महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयांवर व्याख्यानमाला होईल. सर्व शासकीय जिल्हा मध्यवर्ती कार्यालये, पोलीस ठाण्यास फुले-आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट दिल्या जाणार आहेत. शाळा, महाविद्यालयात निबंध, चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा आयोजन करण्याचा प्रयत्न आहे. शेंडापार्क येथील कुष्ठधाम, अनाथश्रम, वृद्धाश्रम,ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन समितीतर्फे गरजूंना विविध वस्तू व आर्थिक मदत दिली जाणार आहे. उपेक्षित लोक कलावंत, कलाकारांनाही मदत केली जाणार आहे. सर्व जातीधर्मातील मान्यवरांच्या सहभागासह यंदाची जयंती वर्षभर विविध उपक्रम राबवून साजरी केली जाणार आहे.