कोडोलीसह परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST2021-04-15T04:22:47+5:302021-04-15T04:22:47+5:30

: कोडोलीसह परिसरातील शासकीय कार्यालये, विविध मंडळांनी व शाळा-महाविद्यालयांत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती मोठ्या उत्साहात ...

Dr. in the area with Kodoli. Babasaheb Ambedkar Jayanti | कोडोलीसह परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

कोडोलीसह परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

: कोडोलीसह परिसरातील शासकीय कार्यालये, विविध मंडळांनी व शाळा-महाविद्यालयांत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कोडोली ग्रामपंचायत कार्यालय, यशवंत हायस्कूल, वासंतीदेवी पाटील फॉर्मसी कॉलेज, चर्च रोड बेथलनगर, आनंदनगर अशा विविध ठिकाणी दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच निखिल पाटील ग्रामसेवक ए. वाय. कदम यांच्यासह मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. वासंतीदेवी पाटील फॉर्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य संतोष पायघन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आनंदनगर येथे संदीप गायकवाड, संतोष चोपडे, अभिजित बनसोडे, संग्राम गाडवे, विकास कांबळे, रोहित कांबळे, देवगन कांबळे, अमित कांबळे आदींनी अभिवादन केले.

Web Title: Dr. in the area with Kodoli. Babasaheb Ambedkar Jayanti