डॉ. अनिता गुणे यांना पीएचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:54+5:302021-06-04T04:18:54+5:30
कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभागाच्या (अॅनाटॉमी) प्रा. डॉ. अनिता राहुल गुणे यांना डी. ...

डॉ. अनिता गुणे यांना पीएचडी
कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभागाच्या (अॅनाटॉमी) प्रा. डॉ. अनिता राहुल गुणे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून पीएचडी जाहीर झाली आहे.
डॉ. अनिता गुणे यांनी ‘डिटेक्शन ऑफ अझुस्पर्मिक फॅक्टर (एझेडएफ) मायक्रोडिलेशन इन अझुस्पर्मिक अँड सेव्हर ऑलिगोस्पर्मिक मेल्स’ या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांना डॉ. आशालता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. गुणे यांच्या या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसाययटीचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी अभिनंदन केले आहे.
०३डॉ. अनिता गुणे