शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीबाबत काँग्रेस नेत्यांची डबल ढोलकी - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:45 IST

जिल्हा परिषद निवडणूक आली की हद्दवाढ नको म्हणायचे आणि महापालिका निवडणूक आली की हद्दवाढ हवी म्हणायचे. हिंमत असेल तर, समाविष्ट करतो म्हणताय त्या पाच गावांची नावे जाहीर करा.

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीबाबत काँग्रेस नेत्यांची डबल ढोलकी सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणूक आली की हद्दवाढ नको म्हणायचे आणि महापालिका निवडणूक आली की हद्दवाढ हवी म्हणायचे. हिंमत असेल तर, समाविष्ट करतो म्हणताय त्या पाच गावांची नावे जाहीर करा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.भाजपचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्याचे प्रकाशन करताना ते बोलत हाेते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, हर्षवर्धन पाटील, आमदार प्रसाद लाड, धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, राहुल चिकोडे, समरजित घाटगे, चित्रा वाघ, शौमिका महाडिक, माधव भंडारी, केशव उपाध्ये, महेश जाधव उपस्थित होते.पाटील म्हणाले, कोल्हापूरसाठी केंद्र शासनाकडून निधी आणण्यासाठी आम्ही बांधील आहोत. सत्यजित कदम आमदार झाल्यानंतर त्यांनी महिन्याला दिल्लीत जाऊन कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी त्यांना यंत्रणा उपलब्ध करून देऊ. पाठोपाठ धनंजय महाडिक यांनाही दिल्लीत पाठविण्याचा आमचा विचार आहे.

सातारा-कोल्हापूर काम कोणामुळे थांबले...सातारा-कोल्हापूर सहापदरी रस्त्याचे ६ हजार कोटी रुपयांचे काम कोणामुळे थांबले? ते ९ हजार कोटींवर गेले. नितीन गडकरी यांनी तेही मंजूर केले. परंतु हे काम सुरू का होत नाही, हे एकदा जाहीर करा, असे पाटील म्हणाले.

वचननाम्यातील मुद्दे...

  • सीएनजी, इलेक्ट्रिक बससेवेसाठी आग्रह
  • महामार्गावरून शहरात सुरक्षित प्रवेशासाठी बास्केट ब्रीजसाठी निधी मंजूर
  • शहरात प्रमुख ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रीजची निर्मिती
  • पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी नरेंद्र मोदी यांनी निधी मंजूर केला आहे. शहरातील सांडपाणी रोखणार
  • रंकाळा प्रदूषणमुक्त करणार
  • महिलांसाठी स्वच्छतागृहे
  • पर्यटकांच्या सोयीचे कन्व्हेन्शन सेंटर उभे करणार
  • सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड
  • नव्या अर्बन डिझाईननुसार शहरातील रस्ते व्हावेत असा आग्रह
  • शहरांच्या चौकांचे सुशोभिकरण
  • बांधकाम व्यावसायिक व वैयक्तिक बांधकामासाठी एक खिडकी योजना
टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा