जिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:01 AM2021-02-01T11:01:28+5:302021-02-01T11:02:16+5:30

Health Kolhapur- नव्या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी जिल्हाभर उत्साहात पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील २ हजार ४५६ केंद्रांवर ३ लाख ३ हजार ५०९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी हातात हात घालून काम करीत ही मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत ७ हजार ७३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Dose of polio to 3 lakh children in the district | जिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

कोल्हापुरात रविवारी पल्स पोलिओ मोहिमेतंर्गत बालकांना लस देण्यात आली.

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील ३ लाख बालकांना पोलिओचा डोस

कोल्हापूर : नव्या वर्षातील पहिली पोलिओ लसीकरण मोहीम रविवारी जिल्हाभर उत्साहात पार पडली. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यातील २ हजार ४५६ केंद्रांवर ३ लाख ३ हजार ५०९ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी हातात हात घालून काम करीत ही मोहीम यशस्वी केली. या मोहिमेत ७ हजार ७३६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरातील सरकारी दवाखाने, सार्वजनिक ठिकाण, बसस्थानक या ठिकाणी लसीकरणासाठी टीम तैनात करण्यात आली होती. या मोहिमेचा प्रारंभ सकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी अधिकाऱ्यांच्या हस्ते नुकत्याच जन्मलेल्या बालकासह पाच वर्षे वयोगटातील बालकांना डोस पाजण्यात आले.

सीपीआरमधील कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा‌ माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य महानंदा मांढरे, सार्वजनिक आरोग्य परिचारक मोजस भोसले यांची उपस्थिती होती.

आमदारांचा कृतीद्वारे संदेश

दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी मुलगा अर्जुन याला कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आणून लस पाजून घेतली. यानंतर पोलिओमुक्तीसाठी लस पाजून घेऊन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले.

 

Web Title: Dose of polio to 3 lakh children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.