कोल्हापूरच्या तिघा कुस्तीगीरांना डोर्फ केटलचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:23 IST2021-01-22T04:23:06+5:302021-01-22T04:23:06+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरचे राष्ट्रीय पदक विजेते विजय पाटील, स्वाती शिंदे आणि नंदीनी साळुंके या तिघांना मुंबईतील डोर्फ केटल इंडिया ...

कोल्हापूरच्या तिघा कुस्तीगीरांना डोर्फ केटलचा मदतीचा हात
कोल्हापूर : कोल्हापूरचे राष्ट्रीय पदक विजेते विजय पाटील, स्वाती शिंदे आणि नंदीनी साळुंके या तिघांना मुंबईतील डोर्फ केटल इंडिया केमिकल कंपनीने दत्तक घेतले असून त्यांना प्रत्येकी वीस हजारांची मदत ऑनलाईन पद्धतीने दिली.
पुण्यात नुकतीच राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा झाली होती. त्यात कंपनीने दत्तक घेतलेल्या आशियाई पदक विजेती स्वाती शिंदे, विजय पाटील, नंदिनी साळुंके यांचा राज्य संघात समावेश झाला. या स्पर्धेच्या तयारीसाठी कंपनीने विशेष प्रोत्साहन म्हणून मदत करावी, अशी सूचना क्रीडा पत्रकार व लेखक संजय दुधाणे यांनी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागप्रमुख संतोष जगधने यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत त्यांनी कंपनीच्यावतीने प्रत्येकी वीस हजार असे एकूण साठ हजार रुपये ऑनलाईनद्वारे पाठविले. विजय सध्या पुण्यातील सह्याद्री क्रीडा संकुलात, तर स्वाती व नंदिनी मुरगूड येथील साईच्या कुस्ती केंद्रात सराव करत आहेत. कंपनीने आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला आर्चरी खेळाडू प्रवीण जाधव याच्यासह आठजणांना दत्तक घेतले आहे.
फोटो : २१०१२०२१-कोल-डोर्फ
आेळी : मुंबईतील डोर्फ कंपनीतर्फे राष्ट्रीय कुस्तीगीर विजय पाटील यास राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी संजय दुधाणे यांच्या हस्ते विशेष मदत निधी गुरुवारी देण्यात आला. यावेळी संदीप पठारे उपस्थित होते.