शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 15:59 IST

तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

राधानगरीराधानगरीधरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली.

आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास या दरवाज्याचे काम सुरु असताना दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता. यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातणीत वाढ होण्याची शक्यता होती. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात ३ ते ४ फूटाने वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी व्यक्त केला होता. तरी नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला.हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने जोरदार कामाला सुरुवात केली. अखेर दुपारी त्याला यश आले आणि हा दरवाजा बंद करण्यात आला. या दुरुस्तीसाठी पाटबंधारा विभागाची अनेक पथके रवाना झाली होती.स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झालाची शक्यता तंत्रज्ञानांनी व्यक्त केली असून आज दिवसभरात कोणत्याही परिस्थितीत गेटची दुरुस्ती पूर्ण करण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला.

पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणारे स्वयंचलित दरवाजे हे धरणाचे वैशिष्ट्ये आहे. यामुळे हे धरण प्रसिध्द असून पावसाळ्यात हे दरवाजे उघडल्यानंतर पर्यटक ही दृश्य पाहण्यासाठी येत असतात. गेली अनेक वर्ष हे धरण मजबुत स्थितीत आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरणriverनदी