‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:55 IST2017-08-12T23:55:56+5:302017-08-12T23:55:56+5:30

Doodle of the Roadromins in 'Kumbhish-Kasari' | ‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंना दणका

‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंना दणका



लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखाना परिसरात निर्भया पथकाने १७ रोडरोमिआेंवर कारवाई केली. शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत शनिवारी दुपारी बारा वाजता ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी, कुंभी-कासारी ते सांगरूळ फाटादरम्यान शाळकरी व महाविद्यालयीन मुलींना सडकसख्याहरींचा वारंवार त्रास होत असल्याच्या तक्रारी शाळा, महाविद्यालयांच्या प्रशासनाबरोबर पालक व मुलींकडून येत होत्या. त्यामुळे करवीर विभागाच्या निर्भया पथकाच्या प्रमुख
पोलीस निरीक्षक अंजना फाळके, पी. एन. शिंदे, पी. एन. भोसले, कॉ. दीपक पाटील
यांनी ही कारवाई करीत तिब्बलसीट दुचाकीस्वार, परवाना नसणाºया १७ युवकांना पकडून कारवाई केली. त्यांना सक्त
समज देऊन सोडण्यात आले आहे. यापुढे जर पुन्हा अशाच गुन्ह्यात सापडल्यास
कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अंजना फाळके यांनी सांगितले.

Web Title: Doodle of the Roadromins in 'Kumbhish-Kasari'