शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवक्त्याच्या आडून बोलू नका, संजय मंडलिकांचे शाहू छत्रपतींना जाहीर चर्चेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 12:54 IST

प्रवक्त्यांचा हुकूमशाही थाट

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांचा केवळ वारसा सांगण्यापेक्षा आपण कोल्हापूरच्या विकासासाठी आतापर्यंत काय पावले उचलली याची जाहीर चर्चा करण्याचे आवाहन महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपती यांना केले आहे. सातत्याने प्रवक्त्याच्या आडून वारसा न सांगता समोर या, असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोहोचवायला आम्ही कटिबद्ध आणि समर्थ आहोत. राजर्षी शाहू महाराज ही आमचीदेखील अस्मिता आहे. ती आम्ही जपूच. पण अस्मिता जपताना आपल्या कर्तव्यात कुठे कसूर होणार नाही याचं भानही प्रतिस्पर्धी उमेदवारानं राखलं पाहिजे. पण सध्या नुसताच वारसा हक्कावर दावा केला जातो आहे. आपल्या ५० वर्षांतील कामाचा लेखाजोखा काही मांडला जात नाही. गादीच्या अपमानाचा कांगावा केला जात आहे. पण, प्रत्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी गादीचा लौकिक वाढावा, राजर्षी शाहूंचा कृतिशील वारसा जपावा यासाठी काय केलं? हेदेखील सांगितलं पाहिजे.मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी केलेला विकास आणि सुधारणा विसरता येत नाही. मात्र त्यांच्या कामाचे श्रेय न घेता आपण कोल्हापूरच्या विकासासाठी काय केले हे आत्ताच्या उमेदवारांनी सांगावे. निवडणुकीच्या निमित्ताने ते विचारण्याची वेळ आली आहे. तेव्हा उमेदवार असलेल्या शाहू छत्रपतींनी समोरासमोर यावे.प्रवक्त्यांचा हुकूमशाही थाटमंडलिक म्हणाले, एकंदरीतच प्रवक्त्यांचा या निवडणुकीतील उत्साह पाहता शाहू छत्रपती यांच्यावर उमेदवारी लादली गेली असल्याचे स्पष्ट होते. तब्बल २५ वर्षे याच मातीत असलेला पैलवान अशी स्वतःची ओळख करून देणाऱ्यांना हे लक्षात येत नाही, की निवडणुकीला उभ्या असणाऱ्या उमेदवाराने प्रचारावेळी आपल्या विकासाच्या अजेंडाबाबत बोलणे महत्त्वाचे असते. आपण सांगू त्याच पद्धतीने प्रत्येकाने वागावे, अशा हुकूमशाही थाटात प्रवक्ते वावरत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती