(पाठवू नये...) खेळाडू घडविण्यासाठी तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:37+5:302020-12-05T04:59:37+5:30
लोकमत सखीमंच- ‘द ब्रिज’तर्फे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्पर्धा जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरची असो; त्यात खेळाडू ...

(पाठवू नये...) खेळाडू घडविण्यासाठी तज्ज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन
लोकमत सखीमंच- ‘द ब्रिज’तर्फे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्पर्धा जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरची असो; त्यात खेळाडू हा केंद्रस्थानी असून त्याच्या कामगिरीवरच देशाचा नावलौकिकही ठरतो. यासाठी प्राथमिक स्तरापासूनच खेळाडू परिपूर्ण घडविण्यासाठी ‘लोकमत सखी मंच - द ब्रिज’ यांच्यातर्फे आज, शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता ऑनलाईन तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
एखादा खेळाडू घडविण्याचे काम तज्ज्ञ करीत असतात. त्यात तंदुरुस्ती, खेळाला आवश्यक असणारे मसल्स, जाॅईंट्स, लिगामेंट्स , टेंडन्स तयार करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट, मानसिक आरोग्य आणि संतुलनासाठी मानसोपचारतज्ज्ञ आणि आहाराकडे न्युट्रिशन एक्स्पर्ट (आहारातज्ज्ञ) यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. प्रशिक्षकानेही खेळाच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक बाब आहे. मात्र, या सर्वांचा ताळमेळ हाेत नाही; किंबहुना एखादा खेळाडू फुटबाॅल चांगला खेळत असेल तर त्याचे पालक त्याने क्रिकेट खेळावे असा लकडा त्याच्या मागे लागतात. तोही पालकांच्या हट्टासाठी खेळतो. त्यात त्याला यश येत नाही. यासोबतच अनेक खेळांमध्ये खेळाडूची शरीरयष्टी योग्य प्रकारची नसते. त्यामुळे अनेकदा यश येण्याऐवजी अपयशच अधिक येते. त्यामुळे खेळाडू आणि खेळ यांच्या प्राथमिक पायरीपासूनच खेळापूर्वीचे व्यायाम व त्यानंतरचे व्यायाम आणि स्पर्धेत होणारी दुखापत याबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच ‘लोकमत सखी मंच’ व ‘ब्रिज’ यांच्यामार्फत हे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित केले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९७६७२६४८८५ यावर संपर्क साधावा.
या कार्यशाळेत काय असणार
स्पोर्टस फिजिओथेरपिस्ट, हायड्रोथेरपिस्ट, डोपिंग, सायकाॅलाजिस्ट, न्यूट्रिशनिस्ट यांच्याद्वारे सर्व क्रीडाप्रकारांतील खेळाडूंच्या उच्च परफाॅर्मन्ससाठी उपयुक्त असे मार्गदर्शन आणि खेळताना जखमी झालेल्या खेळाडूंनी पुन्हा खेळताना घ्यावयाची काळजी आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
चौकट
दोनदिवसीय मोफत फिटनेस कॅम्प
मंगळवारी (दि. ८) व बुधवारी (दि. ९) रोजी विविध खेळांतील खेळाडूंसाठी तंदुरुस्ती अर्थात फिटनेसबाबत शिबिर आयोजित केले आहे. यासाठी ९५४५५१९९५१, ९०९६९५९७५१ या क्रमांकांवर नोंदणी आवश्यक आहे.