बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:20+5:302021-04-25T04:23:20+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकांनी तसेच वित्तीय संस्थांनी एका वेळी कमीत कमी ग्राहकांना आत येण्याची परवानगी द्यावी, त्यांचे ...

बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नका
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकांनी तसेच वित्तीय संस्थांनी एका वेळी कमीत कमी ग्राहकांना आत येण्याची परवानगी द्यावी, त्यांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना आत घेऊ नये, रांगेत १ मीटर अंतर ठेवावे व ऑनलाइन बँकिंगच्या सुविधा वापरण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी केले.
बँकांमध्ये सध्या ग्राहकांची मोठी गर्दी होत असून ते टाळण्यासाठी बँकांना वरील मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना कमीत कमी वेळेत लवकर सेवा मिळावी यासाठी कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी उपस्थित ठेवावेत, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व यूपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन या सुविधांचा वापर करण्यासाठी जागृती व आवाहन करावे. काऊंटरपासून १ मीटर अंतर ठेवावे, तसेच एटीएम, कॅश-चेक डिपॉझिट, पासबुक प्रिंटिंग या मशीनची वारंवार स्वच्छता व सर्वांसाठी सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
--