बाळूमामांच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:15+5:302021-09-10T04:31:15+5:30

बाळूमामा देवालयाचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केले आहे. यावेळी ...

Don't fall prey to fraud in the name of Balumama | बाळूमामांच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका

बाळूमामांच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका

बाळूमामा देवालयाचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केले आहे. यावेळी सचिव रावसाहेब कोणकेरी, सरपंच विजय गुरव उपस्थित होते. अधिक माहिती घेऊन अशांवर वेळ पडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

कार्याध्यक्ष मगदूम म्हणाले, बाळूमामांनी अंधश्रद्धेच्या जोखडातून सर्वसामान्य लोकांना मुक्त करण्याचे काम केले. मुक्या प्राण्यांची सेवा करण्याची शिकवण दिली. मात्र, बाळूमामांच्या वाढत्या कीर्तीचा गैरफायदा घेण्याचे काम काहीजणांकडून सुरू आहे. बकरी पुढे जातील तसे काही ढोंगी साधू निर्माण होत आहेत. बाळूमामांचा भंडारा देऊन आपला आर्थिक फायदा करून घेत आहेत. अशा भक्तांची लूट करणाऱ्या तांत्रिक-मांत्रिक बाबांपासून भाविकांनी सावध रहावे.

अध्यक्ष भोसले म्हणाले, बाळूमामांच्या आदमापूर येथील देवस्थानात देणगीची अधिकृत पावती दिली जाते. अन्य कोणी मामांच्या नावावरून पैसे मागत असल्यास त्याला देवस्थान जबाबदार राहणार नाही. असे कोणी पैसे गोळा करत असल्यास भाविकांनी पोलिसांशी संंपर्क साधावा.

यावेळी विश्वस्त गोविंद पाटील, व्यवस्थापक अशोक पाटील उपस्थित होते.

Web Title: Don't fall prey to fraud in the name of Balumama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.