शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:48 IST

Samarjeet Ghatge : 'टायगर अभी जिंदा है' या शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला. 

गडहिंग्लज : हुकूमशाही व भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधातील आपली लढाई यापुढेही चालूच राहील. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण झटत राहू. पराभवाने सगळे संपत नाही. त्यामुळे घाबरू नका, माझ्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. 'टायगर अभी जिंदा है' या शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये मंगळवारी (दि.२६) आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत समरजित घाटगे बोलत होते. माझ्या पराभवामुळे खचून जावू नका, परिवर्तनाच्या लढाईसाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या, समरजित घाटगे यांचा निसटता पराभव जिव्हारी लागणारा आहे. मात्र, सव्वा लाखाहून अधिक मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास भविष्यासाठी प्रेरणादायी आहे. 

याप्रसंगी शिवाजीराव खोत, रियाज शमनजी, बसवराज आजरी यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच, यावेळी नवोदिता घाटगे, सुनील शिंत्रे, महेश कोरी, दिग्विजय कुराडे, गणपतराव डोंगरे, दिलीप माने, रामदास कुराडे, श्रीपती कदम, बाबासो पाटील, मन्सूर मुल्ला, परमेश्वरी पाटील, अजित खोत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. रमेश पाटील यांनी स्वागत केले.

मतदार, कार्यकर्त्यांचे आभार..! समरजित घाटगे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर तातडीने गडहिंग्लज शहर व कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला आणि उत्स्फूर्तपणे दिलेल्या पाठबळाबद्दल मतदार व कार्यकर्त्यांचे आभारही मानले.

समरजित घाटगे यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव केला. मंत्री मुश्रीफ यांचा हा सलग सहावा विजय असून त्यांनी डबल हॅटट्रिक केली आहे. मुश्रीफ यांना १ लाख ४५ हजार २६९, तर समरजित घाटगे यांना १ लाख ३३ हजार ६८८ मते मिळाली.

टॅग्स :Samarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024