शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवाद नको, कोल्हापूरची हद्दवाढ करा; गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रश्न प्रलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 15:40 IST

कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे; पण एकदा हद्दवाढ होऊ दे

कोल्हापूर : गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असताना दुसरीकडे स्थानिक राजकारणातील कुरघोडीतून श्रेयवादाचा प्रश्न निर्माण करून हद्दवाढीला ‘खो’ घातला जात आहे की काय? अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे; पण एकदा हद्दवाढ होऊ दे, त्याला श्रेयवादातून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट करुन कोल्हापूरकरांना एकोपा करण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हद्दवाढीसाठी आग्रही आहेत. मंत्रालयात याबाबतीत अधिकारी आणि मंत्री पातळीवर चर्चा होत आहेत. गेल्याच आठवड्यात पालकमंत्री केसरकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. एकंदरीत सकारात्मक हालचाली सुरू आहेत.तपोवन मैदानावर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी हद्दवाढ का झाली पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात, असे सांगत हद्दवाढीचे समर्थन केले होते. त्याच्या आधीपासून पालकमंत्री याबाबतीत चर्चा करीत आहेत. राजेश क्षीरसागर तर अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. आमदार जयश्री जाधव यांनीसुद्धा विधानसभेत याबाबत चर्चा घडवून आणली होती. हद्दवाढीची आग्रही मागणी केली आहे. आजही त्या आग्रही आहेत.केवळ सत्तेत असणारे मंत्री, आमदार तसेच विरोधात असणारे आमदार हद्दवाढीची मागणी करीत नाहीत तर येथील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीचे पदाधिकाही मागणी करीत आहेत. विविध संस्थांनीही स्वतंत्रपणे मागणी करणे सुरूच ठेवले आहे. कोणी एक व्यक्ती, आमदार, मंत्री प्रयत्न करीत नाहीत तर सर्वच जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. याची दखल घेत राज्य सरकार सकारात्मक दृष्टीने विचार करून सात-आठ गावांचा समावेश करायचा आणि हद्दवाढीचा विषय संपवायचा अशा प्रयत्नात असताना त्याला वेगळे वळण देण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे.कोणाच्याही कोंबड्याने सूर्य उगवू दे; पण एकदा या शहराची हद्दवाढ हाेऊ दे, अशीच अपेक्षा शहरवासीयांची आहे. कोल्हापूरला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि आता इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर मागणी मान्य होणार असेल तर एकमेकांवर निशाणा साधणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

वादाच्या गोष्टी बाजूला ठेवून हद्दवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाद घालत बसण्यापेक्षा चला आम्हीसुद्धा तुमच्या मदतीला येतो, असे म्हणण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी. जर वाद घालत बसलो तर सरकार आधी तुमचे वाद मिटवा, असे म्हणेल. त्यामुळे सर्वांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी. - बाबा इंदुलकर, हद्दवाढ कृती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर