ज्ञानदीप प्रबोधिनीला ३ वर्षांत ३४ लाखांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:36+5:302021-09-21T04:26:36+5:30
येथील ज्ञानदीप प्रबोधिनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. चौगुले म्हणाले, ज्ञानदीप प्रबोधिनीतर्फे चालविल्या जाणाऱ्या ...

ज्ञानदीप प्रबोधिनीला ३ वर्षांत ३४ लाखांची देणगी
येथील ज्ञानदीप प्रबोधिनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. चौगुले म्हणाले, ज्ञानदीप प्रबोधिनीतर्फे चालविल्या जाणाऱ्या झेप ॲकॅडमीच्या माध्यमातून आजअखेर २० प्रशिक्षणार्थींना शासकीय / निमशासकीय नोकरी मिळाली आहे. नियोजित वृद्धाश्रम, निसर्गोपचार केंद्र आणि ध्यान व योगा केंद्र आदी उपक्रमांसाठी जागा खरेदीसह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
सभेस उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, सहसचिव वासुदेव मायदेव, खजिनदार महेश मजती, संचालक विजयकुमार घुगरे, नंदकुमार शेळके, सुभाष पाटील, संजय चौगुले, रशिदा शेख, रंगा शिंगटे, महादेव पाटील, विजय आरबोळे आदींसह सभासद, देणगीदार, सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. संचालिका मीना रिंगणे यांनी स्वागत केले. सचिव ॲड. संदीप कागवाडे यांनी इतिवृत्त वाचन केले. समन्वयक गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रा. डॉ. आप्पासाहेब आरबोळे यांनी आभार मानले.
देणगीदारांचा सत्कार
ज्ञानदीप प्रबोधिनीला २५ हजारांची देणगी दिल्याबद्दल राजेंद्र पाटील यांचा सपत्नीक शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कार्यक्रमात ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेश मजती, संदीप कागवाडे, बी. एस. पाटील, वासुदेव मायदेव आदी उपस्थित होते.
क्रमांक : २००७२०२१-गड-११