आझाद चौक प्ले कॉर्नरकडून ७ टन लाकूड दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:43+5:302021-05-20T04:24:43+5:30
कोल्हापूर: महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत रविवार पेठेतील आझाद चौक प्ले कॉर्नरने पंचगंगा स्मशानभूमीस शेणी व लाकूड दान करुन सामाजिक ...

आझाद चौक प्ले कॉर्नरकडून ७ टन लाकूड दान
कोल्हापूर: महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत रविवार पेठेतील आझाद चौक प्ले कॉर्नरने पंचगंगा स्मशानभूमीस शेणी व लाकूड दान करुन सामाजिक बांधिलकीची वीण आणखी दृढ केली. तीन हजार शेणी व सात टन लाकूड महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्य अधिकारी डॉ. विजय पाटील व इस्टेट ऑफिसर सचिन जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले
यावेळी प्ले कॉर्नरचे मुकुंद शिंदे, बिपीन लटोरे, रमेश चौधरी, अजित पाटील, विजयकुमार माने, विजय पोळ, मधुकर पाटील, युवराज साळोखे, महादेव पोवार, नितीन भिवटे, राजू नलवडे, लक्ष्मीकांत पाटील, सौरभ लटोरे, शशिकांत कुटे, अजय आपटे, अनिकेत साळवी, योगेश शिंदे, अनुप भिवटे, शिवानंद माळी, अतुल पाटील, राजू समगे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
फोटो: १९०५२०२१-कोल-आझाद प्ले कॉर्नर