चार जिल्ह्यांच्या कार्यालयाचा डोलारा तीन कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST2020-12-17T04:47:39+5:302020-12-17T04:47:39+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : चार जिल्ह्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात मूळ आस्थापनावरील तीनच कर्मचारी ...

Dollars of four district offices on three employees | चार जिल्ह्यांच्या कार्यालयाचा डोलारा तीन कर्मचाऱ्यांवर

चार जिल्ह्यांच्या कार्यालयाचा डोलारा तीन कर्मचाऱ्यांवर

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : चार जिल्ह्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या प्रादेशिक साखर

सहसंचालक कार्यालयात मूळ आस्थापनावरील तीनच कर्मचारी आहेत. सहसंचालक, कृषी

अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिक, शिपाई अशी सात पदे रिक्त असल्याने कामकाज

करायचे कसे? असा प्रश्न आहे. शासनाकडे अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे

दुर्लक्ष होत आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत साखर कारखाने दोन आहेत, ते बंद आहेत. कोल्हापूर व

सांगली जिल्ह्यांतील ३२ सहकारी व खासगी कारखाने आहेत. हा ऊसपट्टा आहे,

त्यात शेतकरी संघटना येथे आक्रमक आहे. सातत्याने निवेदन व आंदोलनामुळे

येथील कार्यालयावर तणाव असतो.

प्रभारी पदाचे ग्रहण

प्रादेशिक साखर सहसंचालकपद हे प्रभारीच राहिले आहे. सचिन रावल यांची बदली झाल्यापासून मध्यंतरीचे तीन महिन्यांचा अपवाद वगळता दोन वर्षे प्रभारीच राहिले. त्यामागील इतिहास पाहिला तर या पदाला प्रभारीचे ग्रहणच लागल्याचे दिसते.

कार्यालयाकडे २०१७ पासून शिपाईच नसल्याने साखर कारखान्यांचे तीन कर्मचारी येथे काम करीत आहेत. गेली १० वर्षे कर्मचारी कारखान्यांचे, मात्र काम प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे, अशीच परिस्थिती आहे.

Web Title: Dollars of four district offices on three employees