सरूड येथे बिबट्याकडून कुत्र्याचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST2021-05-28T04:18:22+5:302021-05-28T04:18:22+5:30
सरूड : सरूड येथील बिरदेवमाळ परिसरात बिबट्याने वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला. ही घटना बुधवारी रात्री ...

सरूड येथे बिबट्याकडून कुत्र्याचा फडशा
सरूड : सरूड येथील बिरदेवमाळ परिसरात बिबट्याने वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याचा फडशा पाडला. ही घटना बुधवारी रात्री घडली. दरम्यान या परिसरात प्रथमच बिबट्याचा वावर आढळून आल्याने येथील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरूडपासून दोन किलोमीटर अंतरावर बिरदेव माळावर गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची वस्ती आहे. याच माळावर बाजीराव काळे यांच्या वस्तीवर बांधलेल्या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने बुधवारी रात्री हल्ला करत त्याला ठार केले. गुरुवारी सकाळी वस्तीवर गेल्यानंतर बाजीराव काळे यांच्या ही घटना निदर्शनास आली. बांबवडे परिमंडलचे वनपाल एम. ए. नायकवडी, वनरक्षक रूपाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले.