शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूरच्या मर्दानी खेळावरील माहितीपटाला प्रतिष्ठेचा फिल्मफेअर, पंचवीस मिनिटांसाठी तीस लाख रुपये खर्च

By संदीप आडनाईक | Updated: December 22, 2022 12:03 IST

दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले 

कोल्हापूर : कोल्हापूरचा निर्माता आणि दिग्दर्शक सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या 'वारसा' या महितीपटाला २०२२ या वर्षाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. नॉन फिक्सन गटात उत्कृष्ट फिल्मचा हा पुरस्कार बुधवारी मुंबईतील ताज लँडएन्ड या सेवन स्टार हॉटेलमध्ये झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहल्यात सोहळ्यात सूर्यवंशी यांनी स्वीकारला. या फिल्मसाठी सलग दोन वर्षे संशोधन करण्यात आले होते. याचे चित्रीकरणही कोल्हापुरात झाले आहे. कोल्हापूरच्या कला व क्रीडाविश्वासाठी ही मोठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. काय आहे माहितीपटात? मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला. या युद्धकलेच्या जोरावर शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे. तीस लाख रुपये खर्च सचिन सूर्यवंशी हे काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्यदिव्य स्वरूपात दिसणारा हा माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल तीस लाख इतका खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले २०१९ मध्ये सचिन सूर्यवंशी यांच्याच 'सॉकर सिटी' या माहितीपटाला फिल्मफेअर मिळाला होता. कोल्हापूरच्या या सुपुत्राने तीन वर्षात दोनवेळा फिल्मफेअर मिळवून कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. आपली मुलं परदेशातील खेळात करियर करतात पण आपल्या मातीतल्या या मर्दानी खेळाला शालेय क्रीडाप्रकारात कुठलेच स्थान नाही. शासनाने या खेळाला शालेय क्रीडाप्रकारात स्थान द्यावे. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू व त्यांना घडविणारे वस्ताद स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ ते केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच जपत आहेत. - सचिन सूर्यवंशी, निर्माता, कोल्हापूर. सहनिर्माते : संदीप बंडा पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी, नरेशन : डॉ. शरद भुताडीया, संगीत : अमित पाध्ये, सिनेमॅटोग्राफी : मिनार देव, प्रशांत भिलवडे

टॅग्स :kolhapurकोल्हापूर