नेसरीत शमनजी समूहातर्फे डॉक्टरांचा वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST2021-07-05T04:16:36+5:302021-07-05T04:16:36+5:30

डॉक्टर्स डे व कृषिदिनाचे औचित्य साधून येथील कै. रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय व यशवंत रेडेकर डी. फार्मसी कॉलेजतर्फे डॉक्टरांचा ...

Doctor's tree planting by Shamanji group in Nesari | नेसरीत शमनजी समूहातर्फे डॉक्टरांचा वृक्षारोपण

नेसरीत शमनजी समूहातर्फे डॉक्टरांचा वृक्षारोपण

डॉक्टर्स डे व कृषिदिनाचे औचित्य साधून येथील कै. रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय व यशवंत रेडेकर डी. फार्मसी कॉलेजतर्फे डॉक्टरांचा सत्कार व वृक्षारोपण असा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रियाजभाई शमनजी होते.

प्राचार्य एम. डी. माळी यांनी स्वागत केले. डॉ. आर. डी. पाटील, डॉ. झेविअर डिसोझा, डॉ. सत्यजित देसाई व डॉ. ख्वाजा मुजावर आदींचा रियाज शमनजी यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी शमनजी यांनी कोरोना काळात प्राणपणाला लावून रुग्णसेवा करत असल्याबद्दल डॉक्टरांचे कौतुक केले. डॉ. आर. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी खजिनदार सुलोचना रेडेकर, प्रा. बी. बी. कडपे, प्रा. किरण धायतोंडे, प्रा. सागर वाघमोडे, सागर सावंत, एकनाथ शिप्पूरकर उपस्थित होते. अजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव लक्ष्मण कंग्राळकर यांनी आभार मानले.

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रोशनबी शमनजी शिक्षण समूहातर्फे संस्थाध्यक्ष रियाजभाई शमनजी, डॉ. झेविअर डिसोझा, आर. डी. पाटील, डॉ. सत्यजित देसाई, डॉ. ख्वाजा मुजावर यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी लक्ष्मण कांग्रळकर, सुलोचना रेडेकर, प्राचार्य एम. डी. माळी आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०४०७२०२१-गड-०८

Web Title: Doctor's tree planting by Shamanji group in Nesari