शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

बेळगावहून आलेला डॉक्टर परिवार १४ दिवसांसाठी अलगीकरणामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 13:12 IST

त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या तिघांनाही ‘सीपीआर’मध्ये पाठविण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये या तिघांचीही तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसीपीआर’मध्ये या तिघांचीही तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठविण्यात आले

कोल्हापूर : नातेवाइकांकडे राहून कंटाळलेला डॉक्टर परिवार बेळगावहून कोल्हापुरात आला खरा; परंतु नागरिकांच्या दबावामुळे तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणामध्ये जावे लागले. येथील महाडिक कॉलनीमधील नागरिकांनी डॉक्टरांना सक्तीने सीपीआर रुग्णालयामध्ये जाण्यास भाग पाडले. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.

येथील महाडिक कॉलनीतील डॉ. एन. एन. पावसकर हे पत्नी, मुलासह २१ मार्च रोजी बेळगावला नातेवाइकांकडे गेले होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊन झाले आणि ते तेथेच अडकले. इतके दिवस राहिल्यानंतर त्यांनी डॉक्टर असल्याने ‘अत्यावश्यक बाब’ या सदराखाली त्यांनी बेळगावच्या पोलीस अधीक्षकांचे पत्र घेतले.

सकाळी ११ वाजता आपल्या सॅँट्रो गाडीतून हे तिघेही भगीरथी अपार्टमेंटमधील घरी आले. बेळगावहून डॉक्टर आलेत ही बातमी कॉलनीमध्ये पसरली. तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात जाऊन तपासणी करून येण्याचा सल्ला दिला; परंतु मी डॉक्टर असल्याने मला माहीत आहे. तपासणीची काही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

मग मात्र शेजाऱ्यांनी कॉंग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी संजय पवार-वाईकर यांना ही माहिती दिली. वाईकर यांनी तातडीने जिल्हा, महापालिका आणि पोलीस अधिकाºयांना ही माहिती दिल्यानंतर यंत्रणा हलली. महापालिकेच्या डॉ. रती अभिवंत, सुवर्णा घाटगे, प्रचिती पखाने, रूपाली सासने यांनी तातडीने पावसकर यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या तिघांनाही ‘सीपीआर’मध्ये पाठविण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये या तिघांचीही तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठविण्यात आले.डॉक्टर आत आले कसे ?परजिल्ह्यांतून येणा-यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. कोगनोळी येथील चेकपोस्टवरून हा परिवार चौकशी न करता कोल्हापुरात आला कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हातावर शिक्का न मारता कोल्हापुरात डॉ. पावसकर यांच्यासारखे कितीजण येतात? नागरिकांनी दबाव टाकला नसता तर त्यांची तपासणी झाली असती का, असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस