शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

...तर सत्तेत मला गृहीत धरू नका--राहुल आवाडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘जर मी आरोग्य समितीचा अध्यक्ष असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार सुधारण्यासाठी कारवाई होणार नसेल, तर मला तुमच्या सत्तेत गृहीत धरू नका,’ अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना स्पष्ट केले. मात्र तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी त्यासाठी तुम्ही जी पद्धत ...

ठळक मुद्देकार्यालय सील करण्याचा अधिकार नाही - शौमिका महाडिक

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘जर मी आरोग्य समितीचा अध्यक्ष असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार सुधारण्यासाठी कारवाई होणार नसेल, तर मला तुमच्या सत्तेत गृहीत धरू नका,’ अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना स्पष्ट केले. मात्र तुमचा हेतू कितीही चांगला असला तरी त्यासाठी तुम्ही जी पद्धत अवलंबली, ती चुकीची होती. जिल्हा परिषद सदस्यांना कोणत्याही कार्यालयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कार्यालय सील करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत महाडिक यांनीही प्रत्युत्तर दिल्याने बुधवारी स्थायी समितीच्या सभेत शाब्दिक चकमक उडाली.

दुपारी एकनंतर समितीच्या सभागृहामध्ये स्थायी समितीची बैठक होती. हुपरी येथे ३० सप्टेंबर रोजी कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमी झालेल्यांना सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले. यावरून संतप्त झालेल्या राहुल आवाडे यांनी रविवारी (दि. १) या केंद्रात भेट देऊन तेथील कागदपत्रे सील केली. त्यांनी अध्यक्षा महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधला; परंतु सुटी असल्याने महाडिक यांनी मंगळवारी प्रत्यक्ष चर्चा करू असे सांगितले. यावरून संतप्त झालेले आवाडे हे स्थायी समितीमध्ये आले.

यावेळी हुपरी आरोग्य केंद्रातील घडलेल्या प्रकाराबाबत आवाडे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. याआधीही तेथील प्रकार मी सभागृहात सांगितला होता. आता पुन्हा रुग्णांना उपचार न करता कोल्हापूरला पाठविण्यात आले. तुम्ही कारवाई करणार की नाही? असा प्रश्न त्यांनी महाडिक यांना विचारला. यानंतर महाडिक यांनी शासन आदेश दाखवीत मुळात जिल्हा परिषद सदस्यांना एखाद्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन तेथील कामकाजात हस्तक्षेप करून शासकीय दप्तर सील करता येत नाही. तुमचा हेतू चांगला असला तरी कामाची पद्धत चुकीची आहे, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आवाडे यांचा पारा चढला.अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई कराराहुल आवाडे म्हणाले, मी हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष आहे. या नात्याने या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. अध्यक्ष या नात्याने मी शासकीय दप्तर शासकीय व्यक्तीकडून सील करून घेतले. त्यावर मी, ग्रामस्थ व काही पत्रकारांच्याही सह्या आहेत. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाºयांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. कारवाई होणार नसेल तर मला सत्तेत गृहीत धरू नका, असेही मी सांगितले आहे. मला स्थायीची नोटीसही वेळेत मिळाली नाही. निधी तर मिळतच नाही.हुपरीतील प्रकार...हुपरी येथे ३० सप्टेंबरला कुत्रे चावल्याची घटना घडली. यातील जखमींना हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सीपीआर रुग्णालयात पाठवले. याबाबत दुसºया दिवशी राहुल आवाडे यांनी येऊन संबंधित सर्वांची कानउघाडणी केली. तसेच दप्तर सील केले. यावरून हे प्रकरण तापले आहे.चौकशी समितीची नियुक्तीयाबाबत अध्यक्षा महाडिक यांनी सांगितले, आवाडे यांनी हुपरीतील प्रकरणाबद्दल निवेदन दिले. त्यांचे म्हणणे मांडले. कुणावरही तडकाफडकी कारवाई करता येत नाही. त्यामुळे एक एमबीबीएस डॉक्टर, कक्ष अधिकारी आणि अकौंटंट यांची एक चौकशी समिती नेमली आहे. १५ दिवसांत याबाबतचा अहवाल मिळेल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. मुळात कुत्र्यांनी घेतलेला चावा हा ग्रेड तीन प्रकारातील असल्याने त्याला विशेष डॉक्टरांच्या निगराणीखाली अ‍ॅँटीरेबीज सिरम इंजेक्शन द्यावे लागते. त्यामुळे त्यांना सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले होते. ही वस्तुस्थिती डॉक्टरांनी मला सांगितली आहे.