गरिबांच्या पोटावर मारू नका

By Admin | Updated: February 4, 2015 00:11 IST2015-02-04T00:08:37+5:302015-02-04T00:11:10+5:30

राष्ट्रवादीचे आंदोलन : गडहिंग्लजला रेशनप्रश्नी तहसीदारांना निवेदन

Do not kill poor people | गरिबांच्या पोटावर मारू नका

गरिबांच्या पोटावर मारू नका

गडहिंग्लज : केशरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद आणि दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना केवळ ५-५ किलो धान्य देऊन गोरगरिबांच्या पोटावर मारू नका, असे आवाहन राष्ट्रवादीच्या येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केले आहे.मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले निवेदन शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिले. आघाडी सरकारने गरिबांंना दिलेल्या अन्नसुरक्षेच्या सवलती भाजप-सेना सरकारने पूर्ववत द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.विभक्त कुटुंबांना नवीन शिधापत्रिका मिळाव्यात, खराब शिधापत्रिका बदलून मिळाव्यात, नव्या शिधापत्रिका त्वरित द्याव्यात या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. शिष्टमंडळात नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, जिल्हा परिषदेच्या सदस्या शैलजा पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी, सतीश पाटील, राजेंद्र तारळे, शारदा आजरी, सिद्धार्थ बन्ने, टी. एल. धुमाळ, तानाजीराव मोहिते, राहुल शिरकोळे, रामदास कुराडे, बाळासाहेब घुगरे, प्रकाश कांबळे, आदींसह नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do not kill poor people