फक्त उसावर अवलंबून राहू नका
By Admin | Updated: July 17, 2017 00:34 IST2017-07-17T00:34:35+5:302017-07-17T00:34:35+5:30
फक्त उसावर अवलंबून राहू नका

फक्त उसावर अवलंबून राहू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
हलकर्णी : शेतकऱ्यांनी पिकविले तरच सर्वांना धान्य मिळते. पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे नियोजन चुकणार आहे. केवळ उसावर अवलंबून राहू नका. कमी पाण्यात कमी दिवसांत येणारी पिके घ्या. समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्यांचा गौरव होतो, असे प्रतिपादन प. पू. श्री. गुरुसिद्धेश्वर स्वामीजी (कारीमठ हत्तरगी) यांनी केले. ते हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे हत्तरकी गटातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
वृक्षारोपण आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक व जि.प. सदस्य रेखाताई हत्तरकी यांचा सत्कार गुरुसिद्धेश्वर स्वामीजींच्याहस्ते झाला.
गंगाधर व्हसकोटी व पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांचा सत्कार महाडिक यांच्याहस्ते झाला.
महाडिक म्हणाल्या, कलेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. उपजीविकेसाठी शिक्षण आवश्यक आहे; पण कला कसे जगायचे ते शिकविते. नेता सामान्य माणसापर्यंत पोहोचल्याशिवाय मोठा होत नाही.
व्हसकोटी म्हणाले, मतदारसंघात अद्याप पेरण्या नाहीत. शासनाला पिकांची आणेवारी देताना या भागाचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्यास अधिकाऱ्यांना सांगावे, तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. यावेळी संदीप व्हसकोटी, श्वेता हत्तरकी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोडसाखरचे संचालक सदानंद हत्तरकी, श्वेता हत्तरकी, जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक, जि.प. सदस्य रेखाताई हत्तरकी, वरदशंकर वरदापगोळ, पं. स. सदस्य इराप्पा हासुरे, पं.स. सदस्या रूपाली कांबळे, सरपंच सुमन भोसले, मदनभाई मेंदपाळा, तमान्ना पाटील, उदय देसाई, सातगोंडा जिनान्नावर, आनंद जाधव, बाबूराव पाटील, मलगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. वरदशंकर वरदापगोळ यांनी स्वागत केले.