दबावाला बळी न पडता आराखडा राबवा

By Admin | Updated: July 3, 2016 00:49 IST2016-07-03T00:49:31+5:302016-07-03T00:49:31+5:30

अंबाबाई मंदिर विकास : १९ मान्यवरांच्या सूचना

Do not fall prey to victim's design | दबावाला बळी न पडता आराखडा राबवा

दबावाला बळी न पडता आराखडा राबवा

कोल्हापूर : राजकीय दबावाला बळी न पडता आराखडा राबवावा, अशा सूचना करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आराखड्यावर नागरिकांनी केल्या आहेत. आतापर्र्यंत १९ जणांनी हरकती व सूचना महापालिकेकडे दाखल केल्या. यात खासदार धनंजय महाडिक यांच्यासह आर्किटेक्ट असोसिएशन, विविध संस्था, संघटना, नगरसेवकांचा समावेश आहे.
अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा २४ जूनला सादर झाल्यानंतर याबाबतच्या हरकती व सूचना शुक्रवारअखेर मागविल्या होत्या. या दिवसापर्यंत १९ जणांनी विविध हरकती व सूचना मांडल्या आहेत. त्यांचा अहवाल दोन दिवसांत महापालिकेचे प्रकल्प अधिकारी सुरेश पाटील फोट्रेस कंपनीला पाठविणार आहेत. तो आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनाही सादर देण्यात येणार आहे. या सूचनांचा विचार करून पुढील बैठक ठरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
दर्शन मंडप व बाह्य परिसरात पाण्याची व स्वच्छतागृहांची सोय, चारही दरवाजे खुले ठेवावेत, शाहू मिल जागेचा आराखड्यात समावेश करून तेथे ५०० खोल्यांचे भक्त निवास, मोफत अन्नछत्राची सोय करावी, साऊंड लाईट, लेझर शोद्वारे कोल्हापूरची माहिती, अ‍ॅम्फी थिएटर, कुटिरोद्योग, गूळ, काकवी, दागिने, चप्पल, मसाल्यांची बाजारपेठ उभारावी.
- खासदार धनंजय महाडिक
महत्त्वाच्या सूचना अशा :
४नगरसेवक आशिष ढवळे : मध्यवर्ती बसस्थानक रिक्षा स्टॉप येथे मल्टिलेव्हल पार्किंग करावे.
४अवधूत सरनाईक : मंदिराच्या भिंतीलगतच्या मिळकतधारकांना स्थलांतरित करावे, रिक्षा स्टॉप, फेरीवाले यांच्यापासून भवानी मंडप मुक्त करावे, कपिलेश्वरसह अन्य मंदिरांचा विकास व्हावा.
४आप्पा लाड : व्यापारी संकुल उभारून येथे कोल्हापूरची खासियत असलेल्या वस्तूंची विक्री व्हावी.
४नगरसेवक शेखर कुसाळे : बाबूजमाल समोर मल्टिलेव्हल पार्किंग व व्यापारी संकुल उभारावे.
४संजय पाटील, जयेंद्र दळवी, राहुल वारे : महाद्वार, घाटी दरवाजा परिसर मोकळा करावा, शहरात दिशादर्शक फलक उभारावेत, अन्य तीर्थस्थानांचा विकास व्हावा.
४महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक संघ : विद्यापीठ हायस्कूल येथे यात्री निवास उभारावे, ओवऱ्यातील दुकाने हटवावीत, कोल्हापूर दर्शन बससेवा सुरू करावी, बिंदू चौक ते भवानी मंडप स्काय वॉक नको.
४नगरसेवक किरण नकाते : नगरप्रदक्षिणा, गणेश मिरवणूक मार्गावर अंडरग्राऊंड वायरिंग करावे.
४कृष्णराव निकम : स्काय वॉकची गरज नाही. याशिवाय नगरसेवक अजित ठाणेकर, सचिन चव्हाण, श्री अंबाबाई भक्त समिती, आर्किटेक्ट असोसिएशन, कोल्हापूर जनशक्ती, महाद्वार रोड फेरीवाले संघटना यांनी लेखी हरकती नोंदविल्या आहेत.

Web Title: Do not fall prey to victim's design

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.