गुळाचे सौदे बंद पाडू नका

By Admin | Updated: October 8, 2014 00:29 IST2014-10-08T00:21:41+5:302014-10-08T00:29:43+5:30

एन. डी. पाटील : अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

Do not discontinue the trade deals | गुळाचे सौदे बंद पाडू नका

गुळाचे सौदे बंद पाडू नका

कोल्हापूर : बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे बंद पाडू नका तसेच गुळाचे दरही पाडू नका, अन्यथा आंदोलन उभा करावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज, सोमवारी येथे दिला.
शाहू मार्केट यार्ड येथील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, गूळ सामंजस्य करार झाला आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या कराराचे व्यापारी, माथाडी कामगार, अडते, शेतकरी अशा गुळाशी निगडित सर्व घटकांनी पालन करावे.
गूळ उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले, गूळ सामंजस्य करारातील अटींबाबत गूळ उत्पादकांमध्ये संभ्रम आहे. तो दूर होऊन योग्य मार्गदर्शन व्हावे
यासाठी ही बैठक घेण्यात
आली.
बाजार समितीचे सचिव संपत पाटील यांनी सामंजस्य करारातील अटींचे वाचन केले. यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, उत्तम पाटील-निगवेकर, पांडुरंग पाटील, रंगराव रेपे यांच्यासह गूळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do not discontinue the trade deals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.