मला राज्यपाल करायचं का? हे पक्ष ठरवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:55+5:302021-09-18T04:26:55+5:30
कोल्हापूर : मला राज्यपाल करायचे की आणखी काय करायचे हे माझा पक्ष आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील. मी अन्य पक्षात जाणार ...

मला राज्यपाल करायचं का? हे पक्ष ठरवेल
कोल्हापूर : मला राज्यपाल करायचे की आणखी काय करायचे हे माझा पक्ष आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील. मी अन्य पक्षात जाणार असल्याच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे वेडेपणा आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबद्दलच्या चर्चांना शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात उत्तर दिले.
पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावी सहकारी अशा केलेल्या उल्लेखाबाबत मी खुद्द उद्धव ठाकरे यांनाच फोन करून विचारेन. फोन न करताही संजय राऊत फोन केला, असे सांगतात. संभाजी ब्रिगेड भाजपसाेबत येण्याची काही चर्चा नाही. कोल्हापुरात पक्ष चौघेच चालवतात असे काही नाही. मी गेल्या दोन दिवसांत ४४ कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आलो आहे. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही.
चौकट
मुंबईत हिंदू जगला ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच
मुंबईत हिंदू जगला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच, असे हिंदू एकताच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ज्या वेळी दंगल होई तेव्हा सर्व नागरिकांना त्या वेळचे नगरसेवक छगन भुजबळ १५-१५ दिवस बाहेर घेऊन जायचे, अशी आठवणही पाटील यांनी सांगितली.