शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

कायदे उद्योजकांनीच पाळायचे का?

By admin | Updated: August 20, 2015 00:45 IST

शंतनू भडकमकर यांचा सवाल : गव्हर्निंग काउन्सिल बैठक

कोल्हापूर : उद्योजकांनी सरकारचे कर भरून कायद्याचे पालन करायचे; पण सरकार उद्योजकांबाबत किती कायद्यांचे पालन करते? असा सवाल महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी केला. कोल्हापुरातील उद्योजकांनी कर्नाटकात जाण्याचा विचार न करता येथेच स्थान बळकट करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅँड अ‍ॅग्रिकल्चरच्या वतीने बुधवारी कोल्हापुरात गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. या बैठकीला धुळे, नाशिक, जळगाव, नागपूर येथील समितीचे ६५ सदस्य उपस्थित होते. भडकमकर म्हणाले, सध्या उद्योगासमोर अनेक अडचणी आहेत. शासन व उद्योग यांच्यामधील दुवा म्हणून चेंबर आॅफ कॉमर्स कार्यरत आहे. मोठ्या उद्योगांबरोबर लघू व मध्यम उद्योगधंद्यासाठी तरुणांना मार्गदर्शनाची भूमिका आमची असते. पश्चिम महाराष्ट्र उद्योगधंद्यांसाठी अतिशय चांगला असून, आगामी काळात येथेच लक्ष केंद्रित केले आहे. राज्य व केंद्र सरकारना उद्योजक विविध कर वेळेत भरून सहकार्य करतात; पण शासन म्हणून सरकारकडून जबाबदारी पार पाडली जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कोल्हापुरातील उद्योग कर्नाटकात, तर विदर्भातील उद्योग छत्तीसगढ येथे निघाले आहेत. सोयी-सुविधा नसल्याने उद्योजकांनी ही भूमिका घेतली असली तरी येथून निघून जाणे तितकेसे सोपे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन आपले स्थान टिकविणे कठीण असल्याचेही भडकमकर यांनी सांगितले. उद्योगात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. भारतात गतीने परिवर्तन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सरकारकडून रोज योजना ऐकावयास मिळते. हे चांगलेपणाचे द्योतक असले तरी या योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. चेंबर आॅफ कॉमर्समध्ये अ‍ॅग्रिकल्चरचा समावेश केल्याबद्दल आनंद होतो; पण शेती व्यवसायाची प्रगती ज्या गतीने सुरू आहे, ती चिंताजनक आहे. यासाठी उद्योजकांनी शेतीला आधुनिकतेची जोड देत परिवर्तन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापुरातील उद्योजकांच्या अडचणी सांगितल्या. जयेश ओसवाल यांनी स्वागत केले. आनंद माने यांनी आभार मानले. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, चेंबर्स आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडले, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, अमित कामत, विलास शिरोरे, अरुण दांडेकर, नेहा खरे, संजय शेटे, प्रदीपभाई कापडिया, नितीन धूत, सीमा शहा, आदी उपस्थित होते.